‘सुख के सब साथी, दुख में ना कोय’ ही जनरीत टाळून सुखापेक्षा माणसाच्या दुःखाचा भागीदार बनणारा, कुणाच्याही संकटकाळात धावून जाणारा, खचलेल्या माणसाला धीर देत आश्वस्त करणारा,
एकांतापेक्षा लोकांतात रमणारा, कायम लोकांमध्ये राहून लोकसंग्रह करणारा, तोडण्यापेक्षा जोडण्याचं महत्त्व लक्षात घेऊन नेहमीच माणसं जोडत जाणारा, आपला परका भेद न बाळगता सर्वांना सोबत घेऊन चालणारा, पदाचा उपयोग सत्ता गाजवण्यासाठी नसून लोककल्याणासाठी असते आणि नियंत्रक नेतृत्वापेक्षा लोकसंग्राहक नेतृत्व चिरंतन काळ टिकणारे असते यावर ठाम विश्वास असणारा,
कोणतीही सत्ता चिरंतन काळ टिकणारी नसते. सत्तेने दिलेले पद सत्तापालटानंतर नष्ट होते, परंतु लोकांच्या हृदयात निर्माण केलेले स्थान मात्र कायम अढळ राहते याची पक्की जाणीव असणारा आणि अडल्या नडल्यांच्या मदतीसाठी कायम धावून जाणारा मदतीवेल्हाळ माणूस म्हणजे प्राचार्य डॉ. महेश वाघ होय.
वडनेर सारख्या एका कॉलेजचे प्राचार्य म्हणून त्यांच्या सर्वसमावेशक आणि खंबीर नेतृत्वाची झलक पहायला मिळते. कुठल्याही फायदा तोट्याचा विचार न करता निस्वार्थी भावनेने मदत करण्याची वृत्ती आणि प्रेमळ स्वभाव यामुळे आपोआपच लोकं त्यांच्याकडे खेचले जातात. त्यांची जनमाणसातील लोकप्रियता, दांडगा लोकसंग्रह आणि प्रचंड सकारात्मक ऊर्जा याचा प्रत्यय कॉलेज टीचर सोसायटीच्या निवडणुकीत सगळ्यांनाच आला. ही निवडणूक एकहाती जिंकण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता, परंतु कुठल्याही पदाची लालसा न धरता जेष्ठ सहकाऱ्यांना पदावर बसवून त्यांनी त्यांचा सन्मान केला. यातून त्यांची विनम्रता आणि नेतृत्वाची ताकदही दिसून येते.
मविप्रच्या क्षितिजावर उगवलेल्या या ताऱ्याची लोकसंग्राहक वृत्ती सेवकवर्ग व प्रशासनाला नक्कीच पूरक ठरेल याबद्दल खात्री वाटते. आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या हातून मविप्र संस्थेची सेवा घडावी या सदिच्छेसह त्यांचे मनःपूर्वक अभिष्टचिंतन! 💐
शब्दांकन – डॉ. सुदाम राठोड, सटाणा महाविद्याल