नाशिक : -कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालयातील कृषिकीटकशास्त्र विभागाअंतर्गत शिकविण्यात येणाऱ्या ”मित्रकिडींचे व्यवस्थापन” या विषयाअंतर्गत विद्यार्थ्यांना बसवंत मधमाशीपालन व कृषीपर्यटनस्थळ,बसवंत हनी पार्क, पिंपळगाव बसवंत येथे भेट देण्यात आली.
भेटी दरम्यान विद्यार्थ्यांनी मधमाश्यांचे कार्य अनुभवले त्याचप्रमाणे मधमाश्यांच्या वसाहती व प्रजाती,बघितल्या, प्रामुख्याने तेथे उपलब्ध असणाऱ्या अपिसप्लोरिसा, अपिससेरेनाईंन्डिका, अपिसमेलिफेरा ह्या प्रजाती बघितल्या, त्याचप्रमाणे डंकविरहित प्रजातींमध्ये मेलिपोनाऐरीडीपेनीस व ट्रायगोनाच्या प्रजाती विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात हाताळल्या, वसाहती हाताळतांना त्यामधील राणीमाशी, कामकरी माश्या व नरमाश्या यांचाही अभ्यास केला.
मधमाश्यां साठी लागणारे परागकण, मकरंद त्यावरून ठरणारा मधाचा रंग व चव यांचाही अभ्यास केला व विविध प्रकारेचे मधाची चव घेतली. त्यासोबत मधाचे महत्त्व मानवी जीवनात अनन्यसाधारण आहे हेदेखील अनुभवले.
पिंकामध्ये परागीकरणाचे महत्त्व, उत्पन्नात व गुणवत्तेत होणारी वाढ याचाही अभ्यास केला. सोबतच द्राक्षाच्या विविध जाती, त्यापासून बनविण्यात येणारे किशमिश, त्याच्या प्रजाती याही प्रत्यक्षात अनुभवल्या, प्राचीन शेती संस्कृती बैलांच्या विविध प्रजाती त्यांचे या जाती यांचाही विद्यार्थ्यांनी अभ्यास केला. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक सहलीस प्रत्यक्षरित्या जास्तीत जास्त शंकांचे निरसन करून अभ्यासाव्यतिरिक्त व्यवसाय म्हणून याकडे कसे बघता येईल याकडे कल दिला आणि भविष्यातही यात उद्योजकता दृष्टिकोनातून विचार केला. सहाव्या सत्रातील विद्यार्थी समवेत विषय प्रा. डॉ. संदीप आहेर उपस्थित होते. शैक्षणिक सहल यशस्वी होण्यासाठी शिक्षणाधिकारी डॉ. अजित मोरे, तसेच कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बापूसाहेब भाकरे यांनी मार्गदर्शन केले.