नाशिक :-म.वि.प्र संस्थेच्या कर्मवीर अॅड. बाबुराव गणपतराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालय, नाशिक येथील २०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची विविध नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांमार्फत निवड करण्यात आली. कॉम्पुटर, आयटी, मेकॅनिकल, इंस्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल,ई अँड टीसी, सिव्हिल आणि एमबीए यासह विविध शाखांसाठी नियमितपणे प्लेसमेंट ड्राईव्ह महाविद्यालयात आयोजित केले जाते. त्यामध्ये यावर्षी (२०२३-२४) प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये सहभागी होणाऱ्या कंपन्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. रोबोयो ग्लोबल,एमर्सन, अल्ट्राटेक सिमेंट, रिषभ इंस्टूमेंट, अरेस सॉफ्टवेअर,विन्जीत,जे एन के इंडिया , परसिस्टंट, फोर्व्हिया अँड टोयो इंजिनिअरिंग हे प्रमुख रिक्रूटर्स होते ज्यांनी प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये भाग घेतला होता. महाविद्यालय आपल्या विद्यार्थ्यांना प्लेसमेंटच्या उत्कृष्ट संधी उपलब्ध करून देण्यात यशस्वी ठरले आहे. देऊ केलेले सर्वोच्च पॅकेज वार्षिक ६.३० लाख इतके होते, केबिटी महाविद्यालय आपल्या विद्यार्थ्यांना प्रदान करत असलेल्या शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या गुणवत्तेबद्दल नेहमीच उत्तोमोत्तम संधी देते. कॉलेज व्यवस्थापनाला यशस्वी विद्यार्थ्यांचा अभिमान आहे आणि आपल्या विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण आणि प्लेसमेंटच्या संधी उपलब्ध करून देणे हे महाविद्यालयाचे उद्दिष्ट आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे मविप्र समाज संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुनिल ढिकले ,सरचिटणीस अॅड.नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षिरसागर ,उपाध्यक्ष विश्वासराव मोरे ,चिटणीस दिलीप दळवी,उपसभापती डी.बी.मोगल, संचालक मंडळ, शिक्षणाधिकारी डॉ.डी.डी.लोखंडे यांनी महाविद्यालयाच्या या कौतुकास्पद कामगिरीसाठी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सतीश आर देवणे,उपप्राचार्य डॉ.व्ही.एम.बिरारी,रजिस्ट्रार सौ.सृष्टी शिंदे, ट्रेनींग अँड प्लेसमेंट ऑफिसर श्री.महेश आडके व सर्व विभागप्रमुख इ. उपस्थित होते.