नाशिक :
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित लोकनेते व्यंकटराव हिरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांची ठक्कर डोम, नाशिक येथील कृषीथॉन प्रदर्शनास भेट आयोजित करण्यात आली. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध स्टॉलला भेटी देऊन त्याविषयीची माहिती जाणून घेतली. अत्याधुनिक कृषी यंत्रे व अवजारे, ड्रीप व स्प्रिंकलर इरिगेशन पद्धती, रासायनिक व जैविक खते, नर्सरीचे विविध स्टॉल अशा विविध ठिकाणी भेटी देऊन विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनातून माहिती प्राप्त केली. विद्यार्थ्यांनी स्टॉल धारकांशी संवाद साधून माहिती मिळविली व शंकाचे समाधान करवून घेतले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे, उपप्राचार्य डॉ. के. एच. कापडणीस, उपप्राचार्य डॉ. मृणाल भारद्वाज, पर्यवेक्षक डॉ. विनीत रकिबे, डॉ. संतोष चोबे, डॉ. सतीष तांबे यांचे मार्गदर्शनाखाली या भेटीचे आयोजन करण्यात आले.
अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. ना. ना. गाढे, डॉ. आशा पाटील, प्रा. सुजाता आहेर, प्रा. पूनम ब्राह्मणकर यांनी विद्यार्थ्यांसोबत कृषीथॉन प्रदर्शनास भेट दिली. प्रदर्शनास अर्थशास्त्र विभागातील पदवी व पदव्युत्तर वर्गातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.