नाशिक :
नाशिक येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित लोकनेते व्यंकटराव हिरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील पदव्युत्तर अर्थशास्त्र विभाग, संशोधन केंद्र आणि आय. क्यू. ए. सी. यांच्या वतीने दिनांक २३ ते २५ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत एम. ए.प्रथम वर्ष अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी उद्बोधन वर्गांचे आयोजन करण्यात आले.
या उद्बोधन वर्गाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे यांच्या हस्ते संपन्न झाले. विद्यार्थ्यांनी सकारात्मक व व्यापक दृष्टिकोन ठेवून ज्ञान संपादन केल्यास जीवनात हमखास यश मिळते असे प्रतिपादन यावेळी मा. प्राचार्य यांनी केले.
पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात महाविद्यालयातील राष्ट्रीय मूल्यांकन व प्रमाण परिषदेचे (NAAC) समन्वयक डॉ. विष्णू आडोळे यांनीआय. क्यू. ए. सी. व नॅक चे महत्व, भूमिका व प्रक्रिया समजावून दिली. तसेच नॅक प्रक्रियेतील विद्यार्थ्यांचा सहभाग व भूमिका याबद्दल विद्यार्थ्याना अवगत केले. महाविद्यालयातील संशोधन केंद्रे, सर्टिफिकेट कोर्सेस, महाविद्यालयाच्या कामकाजाची पद्धती, इत्यादी बद्दल डॉ. अडोळे यांनी सविस्तर माहिती दिली.
अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. ना.ना. गाढे यांनी अर्थशास्त्र विभागाची कार्यपद्धती व विभागात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. के. एच.कापडणीस उपस्थित होते.
उद्बोधन वर्गाच्या दुसऱ्या दिवशी उपप्राचार्य डॉ. के. एच. कापडणीस यांनी
महाविद्यालयाचे नियम , शिस्त व संशोधन याविषयी माहिती दिली. त्यानंतर क्रीडा संचालक डॉ. संतोष पवार यांनी क्रीडा विभागातील योजनांची माहिती देताना क्रीडा विभागाची वैभवशाली परंपरा कथन केली. परीक्षा विभाग प्रमुख प्रा. डॉ. एस. जे. पाटील यांनी परीक्षापद्धती, एक्स्ट्रा क्रेडिट, परीक्षा फॉर्म भरताना घ्यावयाची काळजी इ. बद्दलची माहिती दिली. मराठी विभाप्रमुख प्रा. विद्या सुर्वे यांनी सांस्कृतिक विभागाविषयी माहिती देताना विद्यार्थांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक विभाग सदैव प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन केले.
उद्बोधन वर्गाच्या तिसऱ्या दिवशी विदयार्थी कल्याण अधिकारी डॉ. राकेश पाटील यांनी विविध शिष्यवृत्ती आणि विदयार्थी कल्याणाच्या विविध योजनांविषयी सविस्तर माहिती दिली.
उद्बोधन वर्गात शेवटी सुनील मिरका या विद्यार्थ्यांने प्रातिनिधीक स्वरुपात मनोगत व्यक्त केले. तसेच मानसशास्त्र विभागातील कर्मचारी श्री. मांडवडे यांनीही मनोगत व्यक्त केले.
यानंतर विद्यार्थ्यांनी ग्रंथालयास भेट दिली. ग्रंथपाल प्रा. संभाजी व्याळीज यांनी विद्यार्थ्याना ग्रंथालयाची नियमावली सांगून N-List, Del-net इ. च्या वापराविषयी सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या मानव्यविद्याशाखेच्या अधिष्ठाता व उपप्राचार्य डॉ. मृणाल भारद्वाज, पर्यवेक्षक डॉ. विनीत रकीबे, डॉ. संतोष चोबे, डॉ. सतीश तांबे यांचे मार्गदर्शन लाभले. अर्थशास्त्र विभागातील डॉ. आशा पाटील, डॉ. रूपाली देवरे, प्रा. सुजाता आहेर, प्रा. पुनम ब्राह्मणकर यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले. विद्यार्थ्यांनी मोठ्या आनंदाने व उत्साहाने या उद्बोधन वर्गात सहभाग नोंदविला.
Related Stories
June 17, 2024
June 17, 2024
June 17, 2024