उस्मानाबाद: जिल्हा बालकल्याण समितीच्या अध्यक्षपदी ॲड. विजयकुमार माने तर सदस्य म्हणून ॲड. दीपाली जहागीरदार, ॲड. मैना भोसले, दयानंद काळुंके आणि ॲड. सुजाता माळी यांची निवड करण्यात आली आहे.
या समितीचा कार्यकाल हा तीन वर्षांचा असून, यासाठी काही महिन्यांपूर्वी लातुरात मुलाखती झाल्या होत्या. बन्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आयुक्त कार्यालयाकडून ही यादी जाहीर करण्यात आली. या समितीमध्ये अध्यक्ष विजयकुमार माने व सदस्य दयानंद काळुंके यांनी सामाजिक क्षेत्रात तर ॲड. दीपाली जहागीरदार, ॲड. मैना भोसले व ॲड. सुजाता माळी यांनी विधि क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याने त्यांची निवड केली आहे. जुन्या समितीला निरोप व नवीन समिती पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून कार्यभार सोपविण्याचा कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी जिल्हा महिला व बालकल्याण विकास अधिकारी एस. व्ही. अंकुश, जिल्हा पर्यविक्षा अधिकारी शिरीष शेळके, पर्यविक्षा अधिकारी इरकल, व्यंकट देवकर, बालकल्याण समिती सदस्य नंदकिशोर कोळगे, मावळते अध्यक्ष अश्रुबा कदम, कस्तुरा कारभारी यांची प्रमुख उपस्थिती होती.