भागवत धर्माची पताका देशभरात फडकणारे , भगावत धर्माचे प्रचारक प्रसारक, समाजसुधारक ,जगद्विख्यात तत्वज्ञानी, शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी पोहचवणारे आधुनिक भगिरथ, अंधश्रद्धा निर्मूलनाचे जनक, अहिंसा मार्गांने गोहत्याबंदी करत मानवतेचा संदेश जगाला देणारे राष्ट्र भक्त, देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढवय्या स्वातंत्र्यसैनिकांची अफाट फौज अध्यात्मिक ज्ञान मार्गाने उभा करून राष्ट्र सेवेत अनमोल योगदान देणारे राष्ट्र भक्त,अशी कार्य ओळख देशात निर्माण झालेले राष्ट्र संत भगवान बाबा .ज्या वेळी इंग्रज लोकांना एकत्र येऊ देत नव्हते त्या वेळी अखंड हरिनाम सप्ताह हि संकल्पना निर्माण करत गावागोवी हजारो लोकांना एकत्र करत त्यांच्या मनात राष्ट्र भक्ति निर्माण करत अध्यात्मिक ज्ञानाने चैतन्य निर्माण करून स्वातंत्र्य चळवळ गतिमान करण्यासाठी अनमोल योगदान देत देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनमोल योगदान. मराठावाडा मुक्ति संग्रामातील लढ्यातील हजारो विचारवंत स्वातंत्र्य सौनिक भगवान गडाचे भक्त होते. त्यांना घडविण्यासाठी बाबांच योगदान ऐतिहासिक आहे. हे वास्तव सत्य आहे .म्हणजे भगवान बाबा यांचा मराठवाडा मुक्ती संग्रामात खुप मोठ योगदान होत.सामाजिक समता स्थापित करण्यासाठी संबंध जीवन समर्पित करत असताना, देशभरात भागवत धर्माचा प्रचार व प्रसार करत ज्ञान मार्ग भक्ती मार्ग कर्म मार्ग या ञिवेणी संगमातुन लाखो लोकांच्या मनात देशभक्तीची मशाल पेटवली.असे महान तपस्वी विद्वान अध्यात्मिक क्षेत्रातील अनमोल रत्न राष्ट्र संत भगवान बाबा यांच मुळ नाव आबाजी असुन बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट या ठिकाणी दिनांक 29 जुलै 1896 तुबाजी सानप पाटील यांच्या कुटुंबात जन्म झाला. नारायण गडावर शिक्षणासाठी असताना दसऱ्याच्या दिवशी गुरू मंत्र सोहळा आयोजित केला होता बाल आबाजीला पण गुरू मंत्र घेण्याची इच्छा झाली आणि गुरू माणिक बाबा यांच्या कडे विनवणी केली. माणिक बाबा यांनी सुरवातीला समजावलं पण बाल आबाजी ऐकत नाही म्हटल्यावर शिखरावरून उडी मारल्यावर मंत्र देण्याचं मान्य केलं बाल आबाजी क्षणात शिखरावर आणि माणिक बाबांच्या नावाने आरोळी देऊन उडी घेतली. उडी घेतल्या नंतर श्री भगवान विष्णू गरूडावर अरूढ होऊन साक्षात माणिक बाबा यांच्या समोर आबाजी अवतरले आणि त्या क्षणापासून आबाजीचे भगवान झाले. भगवान बाबा यांनी साक्षात बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी याच बरोबर नाथ संप्रदायातील नवनाथा यांच्या प्रमाणे कठिण आणि घनघोर साधना करून नव निधी अष्ट सिद्धी अर्जित केल्या त्याच उपयोग समाज उत्थानासाठी करत असताना शांती मार्गाने गोहत्या बंद केली म्हणून गोहत्या बंदीचे जनक, मराठवाडा मुक्ती संग्रामा मध्ये अलौकिक योगदान देताना अहिंसा व भक्ती मार्गाचा संगम घडवून समाज प्रबोधन, अंधश्रद्धा निर्मूलन, रूढी परंपरा,मोडीत काढत सामाजिक परिवर्तन घडविण्यासाठी लोककल्याण या उदात्त हेतूने आयुष्य समर्पित करणारे शांती ब्रह्म राष्ट्र संत भगवान बाबा यांनी ज्ञान मार्ग ,भक्ती मार्ग आणि कर्म मार्ग यांचा – त्रिवेणी संगम करत सर्व सामान्य माणसाच्या जीवनात आध्यत्मिक ज्ञान शक्तिने भक्तिच महात्म्य निर्माण केलं. संसाराच्या बहु दुखातुन तरुण जाण्याचा मार्ग सगळ्यांसाठी खुला करत हा मार्ग अंवलबुन स्वतःच आत्महित करा हा संदेश देशभरातील सर्व सामान्य माणसाला देत त्यांच्या मध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचं महान कार्य राष्ट्रसंत भगवानबाबा यांनी समर्पित भावनेने आयुष्यभर केले. आयुष्याच्या प्रवासात अखंड जीवन खडतर संघर्ष आला तरी आपल्या बुद्धीकल्पकतेने संघर्षावर मात केलेले महाबली वीर हनुमान आणि विश्वरत्न संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्यासारखं खडतर ब्रह्मचार्य व्रत स्वीकारुन लोककल्याणासाठी जीवन समर्पित करण्याचा संकल्प वारकरी सांप्रदायाचे दैवत प्रभु विठ्ठला समक्ष निश्चय करुन गुरुमंत्र मिळविण्यासाठी दिव्य अशी परीक्षा दिली. बालअवस्थेत 70 फुट उंचीच्या शिखरावरुन बाल आबाजी यांनी उडी मारल्यावर साक्षात गुरुंना गरुडावर बसून भगवान विष्णु आल्याचा साक्षात्कार झाल्याने बाल आबाजीचे गुरु संत माणिकबाबा यांनी भगवान असे नामकरण केले पुढील काही दिवसातच नारायणगडाचे उत्तराधिकारी म्हणून निवड केली परंतु जन कल्याण करण्यासाठी आणि ईश्वराचा बोध सर्व सामान्य लोकांना झाला पाहिजे यासाठी कठीण तपस्या आवश्यक असते म्हणून योगेश्वरी देवीचे पीठ असणारे अंबाई नगरी म्हणजे आजचे अंबाजोगाई येथून जवळच असणार्या मुकूंदराज यांच्या पावन समाधी मंदिराच्या गुहेत अडीच वर्षे निर्जळ निरंकार ध्यान करत परमेश्वराची तपसाधना केली. सोबत योगसाधना करून आत्मा ते परमात्मा हे गुह्य ज्ञान अर्जित केले.साधना करताना सोबतीला अनेक साप, वाघ, हिंस्त्र पशु आजु-बाजुला बसलेले असायचे या घटनेचे तात्कालिक परस्थिती मधील अनेक लोक साक्षीदार देखिल आहेत. सर्प तर अक्षरशः अंगावर खेळायचे या कठीण परिस्थितीत तपस्या पुर्ण करुन ज्ञानेश्वरी पारायण करत असताना घनघोर तपस्या यशस्वी झाली. आणि नवनिधी अष्टसिद्धी साक्षत प्रसन्न झाल्या . तपस्या पुर्ण करुन पुन्हा तेथून परत आल्यानंतर संतश्रेष्ठ उच्चकोटीचे गुरु बंकट स्वामी महाराज यांची भेट झाल्यानंतर बंकटस्वामी महाराजांनी आपल्या सोबत आळंदी येथे सोबत ठेवून आध्यत्मिक शिक्षण दिलं त्या मध्यातून हजारो लाखो लोकांना किर्तनाच्या मध्यातून ज्ञान देण्यासाठी सज्ज करून पुन्हा लोकसेवेसाठी नारायणगडी पाठवले. त्या क्षणा पासुन अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून लोकांच्या मनात अध्यात्मिक गोडी निर्माण करण्यासाठी नारळी सप्ताह उत्सवाची परंपरा सुरु व इंग्रज सत्ता लोकांना एकत्र येऊ देत नव्हती अशा वेळी भक्ति शक्ति मार्गाने लाखो लोक अखंड हरिनाम सप्ताह साजरा करत एकत्र करून त्यांच्या मध्ये आत्मविश्वास निर्माण केला. जुलमी निजामशाही राजवटीच्या कालखंडात अहिंसेच्या मार्गाने हिंदु धर्मात पवित्र आणि पुजनीय मानल्या जाणार्या गायीची हत्या रोखण्यासाठी चिंचाळा येथे अहिंसा मार्गाने गोहत्या थांबवली त्याप्रसंगानंतर अनेक ठिकाणी गोहत्या बंदीचा लढा त्या काळीच संत भगवानबाबा यांच्या प्रेरणेतून निर्माण झाला. देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी जो परकीय सत्तेविरुद्ध लढा चालू होता त्यामध्ये अहिंसेच्या मार्गाने सहभाग नोंदवून अनेक लोकांचे मनाधैर्य वाढवून त्यांना धिर दिला, एकत्र आणले, अन्यायाच्या विरोधात अध्यात्मिक ज्ञानशक्तीच्या बळावर आपण लढू शकतो व जिंकू शकतो ही प्रेरणा ही स्फुर्ती अनेक देशप्रेमींच्या मनात निर्माण केली. मराठवाडा मुक्तीसंग्राम जो निजामशाहीच्या विरोधात लढा चालू होता त्यामध्ये सुद्धा अनमोल आणि अतुलनीय असे योगदान देवून निजामाच्या ताब्यातून मराठवाडा मुक्त होण्यासाठी सुवर्ण अक्षरांनी लिहावे एवढं मोठं योगदान राष्ट्रसंत भगवानबाबा यांचे आहे. मराठावाडा मुक्ती संग्रामातील लाखो स्वातंत्र्य सौनिक भगवान गडाचे भक्त होते. शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे आणि घराघरात शिक्षण पोहोचले तर प्रचंड हुशार आणि तल्लख असणारी ही माणसे यांची कार्यशक्ती योग्य मार्गाला लागून त्याचे सुयोग्य परिणाम येतील ही काळाची गरज ओळखून शिक्षणाची ज्ञानगंगा बहुजन समाजाच्या दारात आणण्याचे महान कार्य केले. म्हणून आधुनिक भगिरथ संत भगवानबाबा यांचा उल्लेख करणं क्रमप्राप्त आहे. ज्यांनी भक्ती आणि शक्तीचा व्यासपीठ असलेल्या भगवानगडावर अशक्य असतांना देखिल शिक्षण संस्था स्थापना करत गोर गरीब मुलांच्या शिक्षणाची सोय केली आणि तेवढ्यावरच न थांबता उच्च शिक्षणाची सोय व्हावी म्हणून त्या काळी औरंगाबाद सारख्या ठिकाणी दोन एकर जागेवर अन्नछत्र नावाने बोर्डींग उभारली. ज्यामध्ये हजारोच्या संख्येने मुलं उच्च शिक्षण घेवून विद्यार्थी मोठे झाले. रुढी, परंपरा, अंधश्रद्धा या विळख्यात सापडलेला समाज अध्यात्माच्या माध्यमातून योग्य मार्गावर आणण्याचे अनमोल कार्य करत असताना निजाम कालीन राजवटीत धर्म संकटात असतांना लोकांच्या मनातील आत्मबळ वाढविण्यासाठी अखंड हरिनाम सप्ताह,नारळी सप्ताह, दिंडी, भजन किर्तन असे उत्सव स्वतः पुढाकारा घेऊन भरवले आणि ऐक्य निर्माण केले . धर्म जागृत करत धर्म रक्षण केले .संत हे मनाने खुप मोठे असतात. म्हणून ते श्रेय घेत नाहित हा त्यांच्या मनाचा मोठेपणा असतो .ज्यांचं सज्जनत्व भंगत नाही ते संत याचा प्रत्यय जगाला देत असताना नारायण गडावरील प्रसंगाला सामोरे जात असताना संत ते भंगवत हा प्रवास कसा असला पाहिजे याचं वास्तव दर्शन म्हणजे नारायणगडावर असतांना महंत पदावरुन वाद विकोपाला जावू नये म्हणून महंत पद हे भिक्षेची झोळी आहे असं आपल्या भक्तांना समजावून हिमालयात जाण्याचा निर्णय घेताना अंगावरील वस्त्र काढून घेतले तरी सुद्धा आपल्या भक्तांना हाच आदेश दिला कि जिथं अन्न खाल्ल त्या विरूद्ध बंड नसतं आणि महंत पद हे तर भिक्षेची झोळी आहे. त्या मध्ये काय ठेवलंय एवढं उदात्त अंतःकरण म्हणजे साक्षात परमेश्वर भगवान विष्णू यांचा अवातर याचा प्रत्यय लोकांना पुन्हा एकदा आलाच. नारायण गड सोडल्यावर भगवानबाबा यांनी हिमालयात जाण्याचा निर्णय घेतला परंतू खरवंडीचे बाजीराव पाटील यांच्या मातोश्री व सद्गुुरु बंकट स्वामींच्या शिष्य यांनी संत भगवान बाबा यांनी परत यावे म्हणून केलेला अन्न त्याग व बाजीराव पाटील यांचे चाणाक्ष यशस्वी प्रयत्न व सदगुरु सहजानंद भारती यांच्या योग्य शिष्टाई मुळे भगवानबाबांना नगरहुन परत यावे लागले व बहुजनांना हक्काचं धर्मपीठ असावं म्हणून धौम्य गडाची खरवंडीच्या डोंगरावर दसऱ्याच्या दिवशी स्थापना केली. पुढे याच धौम्यगडाचं नामकरण राज्याचे तात्कालीन मुख्यमंत्री श्री.यशवंतरावजी चव्हाण साहेब यांनी आपले ऐतिहासिक मनोगत व्यक्त करतांना राजा-महाराजांनी शस्त्र, तलवार, गाजवून अनेक गड बांधले, जिंकले मला वाटले तशाच पद्धतीचा हा पण गड असेल परंतू येथे ह.भ.प.परमपुज्य शांतीब्रह्म भगवानबाबा यांनी वेदशास्त्र गाजवून हा गड बांधला आहे. माझे सहकारी ना.श्री.बाळासाहेब भारदे यांनी बाबांच्या अलौकिक कार्य बदल विशेष माहिती सांगितली मी स्वतः पंढरीच्या पांडूरंगांचा वारकरी आहे. देवावर आणि दैवावर माझा पुर्ण विश्वास आहे. देशभर वारकरी सांप्रदायाची भगवी पताका फडकत आहे. गड, किल्ले येथूनच महाराष्ट्राचा राजकीय आणि अध्यात्मिक कारभार चालत आलेला आहे आणि तसाही पुढे चालत राहणारा आहे. हा गड अध्यात्मिक क्षेत्रात अढळ असा नवा ध्रुव तारा आज निर्माण झाला आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यापासून संत एकनाथ महाराज यांच्या पर्यंत सर्व संतावर त्या -त्या काळातील दुर्जनांनी अन्याय केला त्रास दिला परंतू ते शांतीब्रह्म असल्याने लोकांवर न रागवता त्यांच्या अपराधाला क्षमा करुनच उदारता दाखवली. जगाच्या कल्याणासाठी संतांच्या विभुती जन्म घेत असतात. भगवान बाबा तर बैसोनी पाणावरी वाचियेली ज्ञानेश्वरी आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी भगवानबाबांचा सिंहाचा वाटा आहे तसेच मराठवाडास्थित निजामाच्याअन्याया-अत्याचाराविरोधात लोकांच्या मनात अध्यात्माच्या माध्यमातून प्रेरणादायी शक्ती निर्माण करुन खुप मोठी स्वातंत्र्यसैनिकाची फळी बाबांच्या माध्यमातून उभी राहीली. अंधश्रद्धा निर्मुलन, पशु हत्या, शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार अध्यात्मिक ज्ञानाच्या माध्यमातून लोकांच्या जिवनामध्ये जागृती अनेक लोकांमध्ये अध्यात्मिक वृत्ती वाढीस लावण्यासाठी केलेले अहोरात्र प्रयत्न हे सर्व भगवानबाबांचे कार्य सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखे आहे. बाबांनी अनेक शाळा सुरु केल्या, वसतीगृहे चालविली, संभाजी नगर सारख्या शहरात गोर-गरीब मुलांच्या उच्च शिक्षणासाठी बोर्डींग चालू केली. धौम्य गडावर चालू केलेल्या शाळेचे मी आज उद्घाटन झाले असे जाहीर करतो. भगवानबाबा यांनी केलेले कार्य आणि त्यांची किर्ती अलौकिक आहे मी पूर्वी ऐकलेली किर्ती आणि येथे आल्यापासून पाहिलेला जनसमुदाय कार्यकर्ते अध्यात्मिक राजकीय, सरकारी क्षेत्रातील तसेच विविध क्षेत्रातील लोकांची बाबांच्या प्रती असलेली ही प्रचंड श्रद्धा बाबांचे अलौकीक कार्य आणि लोकमताचा आदर म्हणून राज्याचा मुख्यमंत्री या नात्याने धौम्य गडाचे भगवानगड असे नामकरण घोषित करतो असे तात्कालीन मुख्यमंत्री श्री. यशवंतराव चव्हाण यांनी शिक्कामोर्तब केलेे. तेव्हा पासून धौम्य गडाचा भगवान गड झाला . पुढे महाराष्ट्र राज्याचे तात्कालिक उप मुख्यमंत्री लोकनेता स्वर्गिय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी भगवान बाबा यांच कार्य देशाचे तात्कालिक पंतप्रधान स्वर्गिय अटलबिहारी वाजपेयी यांच्या निदर्शनास आणले वाजपेयी हे बाबांचं महत्व ऐकुन भारावले व भारत सरकाराने राष्ट्र संत हा दर्जा बहाल करत टपाल तिकीट प्रकाशित केले.
महाराष्ट्राच्या पावन भूमीत संत ज्ञानेश्वर महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज, संत मुक्ताबाई, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, संत रामदास स्वामी, संत गाडगे महाराज, संत गोरा कुंभार, संत चोखा मेळा, संत नामदेव महाराज, संत कान्होपात्रा, संत गजानन महाराज, संत स्वामी समर्थ, साई बाबा, संत अवजीनाथ महाराज, संत सद्गुरु वामनभाऊ महाराज, संत सावता महाराज असे संत महापुरुष, सिद्धपुरुष, होऊन गेले असेच राष्ट्र संत भगवानबाबा ज्यांनी जातीभेद, धर्मभेद, वर्ण-रंग, रुप अशा गोष्टींना कधीही थारा दिला नाही याचे कृतीशील उदाहरण म्हणून त्यांनी आपले उत्तराधिकारी व भगवानगडाचे महंत म्हणून ह.भ.प. भिमसिंह महाराज राजपूत यांची निवड केली. बाबांच्या या महान व अलौकीक कार्यास जयंती निमित्त कोटी कोटी वंदन व विनम्र अभिवादन
गणेश खाडे
विचारवंत, साहित्यिक, लेखक, आध्यत्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य 9011634301