पुणे:
तू प्रसन्न मूर्ती
तू ज्ञान मूर्ती
ग्रंथ सेवा ध्यास तुझा
जिवापरी जपलास हा ठेवा
मनीषा ताई यांना भेटून एक नवीन ऊर्जा प्राप्त होते.त्यांचा उत्साही स्वभाव आणि प्रामाणिकपणा मला भावतो.
ग्रंथ आणि ग्रंथालय वलयाभोवती वावरणारी मनीषा ताईं सामान्य कुटुंबातील स्त्री. वडील गिरणी कामगार. त्यामुळे घरची परिस्थिती बेताची. मनीषा ताईचे प्राथमिक शिक्षण महानगर पालिकेतील शाळेत तर माध्यमिक शिक्षण शारदाश्रम विद्यामंदिर येथे पूर्ण झाले. पुढे बी.ए., एम.ए. तसेच ग्रंथालय आणि माहितीशास्त्र पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. शारिरीक अपंग असूनही शिक्षणात त्यांनी कधी तडजोड केली नाही. त्यांची आई नेहमी म्हणायची, ‘तू हवं तितकं शिक.’ शैक्षणिक पातळीवर अनेक दिग्गज शिक्षक, गुरूजन याचा सहवास लाभला. त्यामुळेच ज्ञानसंपन्न होण्याचा ताईनी मनसोक्त आनंद घेतला.
शिकणं आणि शिकवणं हा आवडता छंद असल्याने दहावीनंतर महाविद्यालयातून आल्यावर घरी शिकवणी वर्ग घेणं चालू केले. त्यात्तून दोन गोष्टी त्यांना साध्य झाल्या. एक म्हणजे आत्मिक समाधान तर दुसरे म्हणजे स्वकमाई करण्याची सवय लागली. शारीरिक अपंगत्वामुळे समाजासमोर येण्यास न्यूनगंड मनात असल्याने नोकरी हा विषय मनिषा ताईच्या कधी विचारात नव्हता. पण कहीतरी वेगळं करण्याची उर्मी मात्र मनाशी होती. आपल्याला देवानं काहीतरी वेगळं करण्यासाठी आणलं आहे, असं समजून आलेल्या परिस्थितीला सामोर जाण्याचा प्रयास करत त्या करत होत्या.
जगणं छान चालू असतानाच अचानक ताईच्या आईच निधन झाल. आणि आयुष्याची चाक ठप्प झाल्याची जाणीव त्यांना झाली. सुरक्षिततेचे कवच, छत्रछाया संपली आणि स्वत्व काय असत याची जाणीव झाली. त्या प्रसंगाने त्या नोकरी निमित्ताने सापेक्ष दुनियेत वापरण्यास सज्ज झाली. भयभीत होऊन नोकरी मोहीम चालू केली. कमी उंचीच्या कारणान नोकरी न मिळण्यास पहिलं अपयश त्यांनी पचवलं. परंतु नंतर आपली यशस्विता आपणच मिळवायची. यासाठीच आपण शिकलो असे ताई नी अपल्या मनावर बिंबवले आणि एक नवीन तेजोमय प्रवासाला त्यांनी सुरुवात केली.
अशाच एका दिवशी मुंबई मराठी ग्रंथालय विश्वस्त कै. सुधा भट यांची भेट झाली. त्यांनी लागलीच मनिषा ताईंचा प्रामाणिकणा आणि त्यांची योग्यता बघून त्यांना नोकरी दिली. आता त्यांनी दाखविलेला विश्वास सार्थकी लावणं ही ताईंनी आपली जबाबदारी समजली. आणि ती त्यांनी उत्तमच पार केली. या यशात सुनिल कुबल यांचे मार्गदर्शन मोलाचं ठरवल. देवाने ताईसाठी देवदूत पाठवले असे मनाशी बोलत ईश्वराचे या क्षणातोक आभार मानले. त्यानंतर अनेक छान छान संधी मिळत गेल्या. ‘नवी संधी नवा अनुभव’ असं’ जणू समीकरणच झाल. हे सगळं अनुभवत असताना शिकवणीच्या तासाला कधीही अंतर दिल नाही. कारण नवा विद्यार्थी नवा अनुभव शिकवून जातो. आणि हेच तर ताईंच्या यशाच टॉनिक आहे.
2007 मध्ये मनिषा ताईला महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय शास्त्र परिक्षा मंडळ अंतर्गत शिकविण्याची एक सुवर्ण संधी कुबल सरांनी दिली.त्यांची मानसिक स्थिती नकाराची होती हे ओळखून सरांनी आदेशच दिला उद्यापासून तू व्यवस्थापन शिकविणार आहेस. त्यांना नाही म्हणजे आपण नास्तिक ठरणार हे मनाशी ठरवलं. तासिका चालू करण्यासाठी स्वतः ताई सोबत वर्गात येऊन विद्यार्थ्यांशी ओळख करून देत. निघताना पाठीवर एक सकारात्मक थाप देऊन निघून जात. त्यांनाच ताईच्या यशाची खात्री असते. याची जाणीव आणि कुतूहल होते.
त्यानंतर साहित्य क्षेत्रातील नामवंत साहित्यिक माजी विश्वकोश अध्यक्षा डॉ. विजया वाड यांचा सहवास ताईला लाभला. आणि आयुष्याला नवी कलाटणी मिळाली. त्याच्याकडून साहित्याचे अगाध ज्ञान मिळाले.त्यांची गुरू-शिष्याची जोडी सर्वांमुखी असते. अनेक प्रकल्प, उपक्रम त्या लीलया परिपूर्तीकडे नेले. विजयाताई यांनी सांगितले, ‘सौदर्याचा मार्ग ह्रदयापासून सुरु होतो आणि कर्तृत्वापाशी थबकतो. या त्यांच्या उपदेशाने ताई साठी मनान उंच भरारी घेणं सहज शक्य झाल. आता नवी संधी बाप्पा चरणी म्हणजेच बृहन्मुंबई महानगर पालिका संचलित श्री सिद्धिविनायक मंदिर न्यास ग्रंथालय/वाचनालय संगणकीकृत सुसज्ज, अद्ययावत ग्रंथालयातील वाचनसहित्य साहित्यिक, विद्यार्थी वर्ग, तज्ञ यांच्यापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे.
श्री आदेश बांधेकर सर विश्वस्त सिद्धिविनायक ट्रस्ट यांनी वेळोवेळी ताईंचे मनोबल वाढविले आणि जातीने ते त्यांची चौकशी करतात.तसेच त्यांना प्रत्येक नवीन कार्यासाठी प्रोत्साहन देतात.
निशिगंधा वाड ताई चे मनीषा ताईवर विशेष प्रेम आहे.अगदी प्रेमाने आणि काळजीने निशगंधा ताई गेली अनेक वर्ष मनीषा ताई सोबत आहेत.मनिषताई साठी त्या जणू देवदूत आहेत असं त्या नेहेमी म्हणतात.
निशिगंधा ताईच्या मार्गदर्शनात मनीषा ताई आणि मी काही उत्तम प्रकल्प हाती घेतले आहेत आणि ते निश्चितच यशस्वी होतील.
असा हा त्यांचा तेजोमय प्रवास असाच सुरू राहील आणि त्यांची ग्रंथसेवा सिद्धिविनायक चरणी अर्पण असून त्यांना नवीन सकारात्मक ऊर्जा लाभत राहणार हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
डॉ राणी दुष्यंत खेडीकर
अध्यक्ष
बाल कल्याण समिती पुणे