नाशिकः
तपोभूमी, यंत्रभूमी, साहित्यभूमी व शैक्षणिकभूमी म्हणून ओळख असलेले नाशिक द्राक्ष व कांदा उत्पादनासाठी जगप्रसिद्ध असून देशात सर्वात उच्च प्रतीच्या द्राक्षांचे उत्पादन नाशिक मध्ये होत असल्याने नाशिक द्राक्ष उत्पादनाची राजधानी बनली आहे, परिणामी शेतमाल प्रक्रिया उद्योगाचा नाशिक अर्थव्यवस्थेत मोलाचा वाटा आहे. वाईन-निर्मितीत देखील जिह्वा अव्वल असून वाईन कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून नाशिकची ओळख सर्वदूर परिचित आहे. सद्यस्थितीत नाशिक मध्ये ३० च्या वर वायनरी कार्यरत असून बाजारात जगप्रसिद्ध वाईन ब्रँड सुला चा दबदबा आहे असे प्रतिपादन नवनिर्वाचित सिनेट सदस्य व महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. अपूर्व हिरे यांनी मूल्यवर्धित अभ्यासक्रमासाठी जनाऱ्याविद्यार्थ्याना संबोधताना केले. स्थानिक क्षमतांच व साधन संपत्तीचा पुरेपूर वापर करून नवनवीन उद्योग व्यवसायास चालना मिळणेकामी विद्यार्थ्यांकरिता मूल्यवर्धित अभ्यासक्रम महाविद्यालया मार्फत राबिविले जातात, पंचवटी येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (एमबीए) महाविद्यालय व वाईन इन्फोर्मशन सेन्टर, विंचूर यांच्या संयुक्त विद्यमानाने विद्यार्थ्यांकरिता “वाईन टूरिझम” या मूल्यवर्धित अभ्यासक्रमाच्या अल्पमुदतीच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. विंचुर एमआयडीसीतील वाईन इन्फॉर्मशन सेंटरचे संस्थापक श्री. विक्रांत होळकर यांनी कार्यशाळेस मोलाचे मार्गदर्शन केले. वाईन उत्पादन प्रकल्पांचे कार्य कसे चालते. त्यांचे मॅनेजमेंट कसे केले जाते. याबाबत ची माहिती मिळावी म्हणून श्री. होळकर यांनी निफाड व विंचुर परिसरातील विविध वाईनरीजला क्षेत्रभेट घडून आणत एमबीएच्या विद्यार्थ्यांना रोजगार व्यवसायाच्या कुठल्या नवनवीन संधी उपलब्ध आहेत या बाबत सविस्तर माहिती दिली. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना या क्षेत्रात असणाऱ्या संधी आणि त्यांचा लाभ कसा घेता येईल याबाबत स्वतःचा उदाहरणातून मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या उत्तारार्धात वाईन इन्फॉर्मशन सेंटर विंचुर येथे भेट देत विद्यार्थ्यांनी द्राक्ष उत्पादकां समोरील तसेच वाईन उत्पादक समोरील विविध आव्हाने आणि समस्या व त्यावरील उपाय योजना याबाबत गट चर्चा करत होळकराच्या सादरीकरणात सहभाग नोंदवला. कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी महाविद्यालयाचे संचालक डॉ. गणेश तेलतुंबडे यांनी विद्यार्थ्यांना अनुभवात्मक व प्रायोगिक शिक्षण पद्धतीचा अवलंब करत हसतखेळत शिक्षण संकल्पनेबाबत मार्गदर्शन केले. व्यवस्थापनबाबत पैलू समजावून सांगताना कृषी पर्यटन, द्राक्ष महोत्सव, सुला फेस्ट आदी केस स्टडीज विद्यार्थ्यांसमोर मांडल्या. कार्यशाळेसाठी आभार प्रदर्शन शैक्षणिक विभागप्रमुख डॉ. जयश्री भालेराव यांनी केले. वाईन इन्फॉर्मशन सेंटर मार्फत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरीत करत कार्यशाळेचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाच्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.
Related Stories
September 24, 2024
June 17, 2024
June 17, 2024