निवडणूक पोलीस निरीक्षक गौरव शर्मा यांची अंधेरी पश्चिम मतदारसंघात भेट
Share this:
- Click to share on Twitter (Opens in new window)
- Click to share on Facebook (Opens in new window)
- Click to print (Opens in new window)
- Click to share on Pinterest (Opens in new window)
- Click to share on Pocket (Opens in new window)
- Click to share on Telegram (Opens in new window)
- Click to share on WhatsApp (Opens in new window)
२० मे रोजी मतदान करण्याबाबत केले आवाहन
मुंबई उपनगर : 26 मुंबई उत्तर आणि 27 मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघासाठीचे पोलीस निरीक्षक गौरव शर्मा यांनी 165 मतदारसंघ अंधेरी पश्चिम येथील मोरगाव चाळीला भेट दिली. त्यावेळी त्यांनी या चाळीतील मतदारांना 20 मे 2024 रोजी आपला मतदानाचा हक्क बजावत मतदान करण्याचे आवाहन केले.
लोकसभा निवडणुकीत मुंबई उपनगर जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक पोलीस निरीक्षक श्री. शर्मा यांनी त्यांच्या विधानसभा मतदारसंघ अंधेरी (पश्चिम) येथील मोरगाव चाळीला भेट दिली. यावेळी त्या मतदारसंघातील आणि चाळीतील सुमारे शंभर मतदार तसेच यावेळी तहसीलदार तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहलता स्वामी, आणि वरिष्ठ अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार ‘एकही मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये’, हा उद्देश समोर ठेवून श्री. शर्मा यांनी मतदानाबाबत जनजागृती केली. यावेळी उपस्थितांना आचारसंहितेचे उल्लघंन झाल्यास तक्रार करण्यासाठी सुरू आलेल्या सी व्हिजील (C-Vigil) ॲपबद्दल सविस्तर माहिती दिली. प्रत्यक्ष निवडणूक पोलिस निरीक्षक आपल्या भेटीला आल्याचे पाहून पोलिसांच्या भेटीचे जनतेने कौतुक केले. या भेटीमुळे मतदारांमध्ये मतदान प्रक्रियेत सहभाग घेण्याबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले. यावेळी मतदारांना प्रवृत्त करण्यासाठी श्री. शर्मा यांनी ‘चमकिला’ चित्रपटातील त्यांनी लिहिलेले गाणे म्हणत मतदान करण्यासाठी आवाहन केले.
चलो वोट करो, चलो वोट करो जी, चलो वोट करो मेरे यारो, चलो वोट करो जी, चलो वोट करो जी, अपनी जिमेदारी निभाओ मेरे यारो,
तुम सभी समझदार हो, वोट जरुरी हैं, तुम सभी इमानदार हो, वोट जरुरी हैं,
चलो वोट करो जी, चलो वोट करो जी, चलो वोट करो मेरे यारो, चलो वोट करो जी, चलो वोट करो जी, अपनी जिमेदारी निभाओ मेरे यारो