विदेशी प्रतिनिधी सहभागी झाले लोकशाहीच्या उत्सवात
Share this:
- Click to share on Twitter (Opens in new window)
- Click to share on Facebook (Opens in new window)
- Click to print (Opens in new window)
- Click to share on Pinterest (Opens in new window)
- Click to share on Pocket (Opens in new window)
- Click to share on Telegram (Opens in new window)
- Click to share on WhatsApp (Opens in new window)
पेण व अलिबाग तालुक्यातील मतदान केंद्रावर जाऊन अनुभवली निवडणूक मतदान प्रक्रिया
रायगड :–लोकसभा सार्वत्रिक निवडणूक पाहणीसाठी जिल्ह्यात आगमन झालेल्या विदेशी प्रतिनिधी मंडळातील सदस्यांनी आज पेण व अलिबाग तालुक्यातील वेगवेगळ्या मतदान केंद्रावर प्रत्यक्ष जाऊन लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होत निवडणूक मतदान प्रक्रिया जवळून अनुभवली. विदेशी प्रतिनिधी मंडळातील बांग्लादेशचे 2 प्रतिनिधी महंमद मोनिरुझ्झमन टी , जी एम शाहताब उद्दीन (बांग्लादेश निवडणूक आयोग अधिकारी) कझाकिस्तान देशाचे 2 प्रतिनिधी नुरलान अब्दिरोव, आयबक झीकन(केंद्रीय निवडणूक आयोग कझाकीस्तान), श्रीलंका देशाच्या सिलया हिलक्का पासिलीना(संचालक श्रीलंका) झिम्बाबे देशाचे न्यायमूर्ती प्रिशीला चिगूम्बा आणि सिम्बराशे तोंगाई (केंद्रीय निवडणूक आयोग झिम्बाबे) हे सातही सदस्य आजच्या मतदान पाहणी दौऱ्यात सहभागी झाले होते.
मतदान प्रक्रिया सुरु होण्यापूर्वी मतदान यंत्राची अंतिम पडताळणी करण्यासाठी होणारे ‘मॉक पोल’ पाहण्यासाठी सकाळी ५ वाजल्यापासून सर्व विदेशी प्रतिनिधींचा ताफा वेगवेगळ्या मतदान केंद्रावर पोहचला होता. या मतदान प्रक्रियेच्या शुभारंभाची माहिती जाणून घेण्यासाठी उत्सुकतेने भेट देऊन प्रतिनिधींनी समाधान व्यक्त केले. यावेळी ‘मॉक पोल’ ही प्रक्रिया ईव्हीएम मशिनची विश्वासर्यता आणि पारदर्शकता वाढविण्यासाठी अत्यंत उपयुक्त असल्याची प्रतिक्रिया या प्रतिनिधींनी यावेळी व्यक्त केली.
मतदान केंद्रात मतदानासाठी येणाऱ्या मतदारांनी विदेशी पाहुण्यांनी भारतीय पद्धतीने नमस्कार करून दुभाषक यांच्या माध्यमातून संवाद साधला. पारंपारीक पध्दतीने केलेल्या स्वागताचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. जिल्ह्यातील विविध मतदान केंद्राना भेटी देऊन निवडणूक प्रक्रिया व बाहेरील वातावरण याची बारकाईने माहिती घेतली.
प्रत्येक मतदान केंद्रावर केलेली जय्यत तयारी, दिव्यांगांसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी केलीली विशेष व्यवस्था, महिला किंवा तरुणांचे विशेष केंद्र, सेल्फी पॉईंट, फर्स्ट एड किट सारख्या अनेक बाबी प्रतिनिधींना भारावून टाकणाऱ्या होत्या. मतदानासाठी उत्साहाने आलेल्या मतदारांचा उत्साह त्यांनी यावेळी पाहिला. तसेच काही ठिकाणी तयार करण्यात आलेल्या सखी मतदान केंद्र, युवा मतदान केंद्र, आदर्श मतदान केंद्र, दिव्यांग स्वयंचलीत मतदान केंद्रावर भेट देऊन मतदान केंद्रावर उपस्थित असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. या सर्व प्रतिनिधीनी आकर्षक पद्धतीने बनविलेल्या सेल्फी पाॅईन्टवर फोटो काढला. सामान्य मतदाराप्रमाणे ते सर्वजण लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी झाले होते.
मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून मतदारांसाठी स्वीप उपक्रम, मतदान केंद्रावर प्राथमिक उपचार, यांची माहिती याबाबत त्यांनी मतदान अधिकारी कर्मचारी, आरोग्य सेविका व आरोग्य कर्मचारी यांच्याशी संवाद साधला.
गेली दोन दिवस भारतीय लोकशाही मधील निवडणूक कशा पद्धतीने पार पाडली जाते याचे प्रात्यक्षिक त्यांनी पाहिले. निवडणूक यंत्रणाचे कामाप्रती असलेल्या निष्ठा आणि प्रामाणिक पणा याचे त्यांनी विशेष कौतुक केले.