आपले योग्य ते कारण कळवावे तसा लेखी अर्ज कार्यालयास जमा करणे बंधनकारक राहील.
Share this:
- Click to share on Twitter (Opens in new window)
- Click to share on Facebook (Opens in new window)
- Click to print (Opens in new window)
- Click to share on Pinterest (Opens in new window)
- Click to share on Pocket (Opens in new window)
- Click to share on Telegram (Opens in new window)
- Click to share on WhatsApp (Opens in new window)
जिल्हा माध्यम कक्षाच्या कामकाजाबाबत व्यक्त केले समाधान
रायगड :निवडणूक प्रक्रियेमध्ये माध्यमांची भूमिका महत्त्वपूर्ण असून विविध माध्यमाने समन्वय राखताना माध्यम कक्षाने सतर्कतेने भूमिका पूर्ण करावी असे प्रतिपादन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी केले.
जिल्हा माहिती कार्यालयात कार्यालयात लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने स्थापन माध्यम संनियंत्रण व जनसंपर्क कक्षाला भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली. यावेळी माध्यम कक्षाच्या कामकाजाबाबत श्री. चोकलिंगम यांनी समाधान व्यक्त केले.
मुख्य निवडणूक अधिकारी श्री. चोकलिंगम यांनी विविध माध्यमांमधील जाहिराती आणि पेड न्यूजबाबत कक्षातर्फे करण्यात येणाऱ्या कार्यवाहीची माहिती घेतली. जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे यांनी माध्यम कक्षाच्या कामकाजाविषयी माहित दिली.
माध्यम कक्षात सुमारे 8 दूरचित्रवाणी संचांच्या माध्यमातून वृत्तवाहिन्यांतील निवडणूक प्रचार, जाहिरात, पेड न्यूज आदींच्या अनुषंगाने संनियंत्रण केले जात आहे. तसेच सोशल मीडियावरील पोस्टबाबतही बारकाईने संनियंत्रण केले जात आहे. वृत्तपत्रातील जाहिराती आणि पेड न्यूजबाबतही दररोजच्या वृत्तपत्रांचे अवलोकन केले जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
श्री चोकलिंगम यांनी सीव्हिजील कक्षालाही भेट देऊन नागरिकांच्या तक्ररी संदर्भात करण्यात येणाऱ्या कार्यवाहीची माहिती घेतली.यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे आदी होते.