
माझ्या भावाचे वर्गमित्र श्री.राजाराम कालेकर साईबाबा संस्थान कर्मचारी तसेच सौ सुरेखाताई कालेकर अंगणवाडी सेविका या दांपत्याची कन्या प्रियंका कालेकर हिने नुकताच एमबीबीएस चा कोर्स पूर्ण केला.आता ती डॉक्टर म्हणून समाजाच्या सेवेमध्ये रुजू होणार आहे.कोऱ्हाळेसारख्या ग्रामीण भागात शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या व सामान्य परिस्थिती असलेल्या प्रियंकाने चिकाटीच्या जोरावरती दहावीला गावातीलच न्यू इंग्लिश स्कूल,कोऱ्हाळे या शाळेत 95 टक्के गुण मिळविले. तसेच अकरावी व बारावी सायन्सला गावातील श्री गणेश शिक्षण संस्थेच्या श्री गणेश ज्युनिअर कॉलेजमध्ये दोन वर्ष नीट ची परिपूर्ण तयारी केली व नीट मध्ये तिला 585 गुण मिळाले. या नीटच्या गुणांच्या आधारे तिला शासकीय कोट्यामधून बीजे मेडिकल कॉलेज, पुणे येथे एमबीबीएस साठी प्रवेश मिळाला व तिचे शिक्षण पूर्ण झाले.शैक्षणिक वर्ष 2017-18 मध्ये बारावी सायन्स मध्ये तिला 95 टक्के गुण मिळाले तसेच फिजिक्स मध्ये 100 पैकी 100 गुण मिळाले. ग्रामीण भागातील प्रियंकाने असामान्य बुद्धिमत्तेच्या जोरावरती उत्तुंग असे यश संपादन केले. तिचा भाऊ अनिकेत कालेकरला ही दहावीला 95 टक्के गुण होते. त्याने देखील इंजिनिअरिंग पूर्ण केलेले आहे. राजाराम व सुरेखा वहिनींची चिकाटी तसेच अनिकेत व प्रियांका ची बुद्धिमत्ता या जोरावरती ग्रामीण भागात असून देखील या बहिण-भावाने उच्च शिक्षण पूर्ण केले व कोऱ्हाळे पंचक्रोशी मध्ये एक नवीन आदर्श निर्माण केला. प्रियंकाच्या यशासाठी खूप खूप अभिनंदन.
प्रियंका व अनिकेत यांचे हे यश त्यांच्या पालकांच्या कष्टाचा कोहिनूर हिरा आहे असे म्हणायला हरकत नाही, आणि हा कोहिनूर हिरा कायम चमकत राहून ग्रामीण भागातील पालक व विद्यार्थी यांना चमकण्याची प्रेरणा देत राहील.
तिच्या यशामध्ये उल्लेखनीय वाटा असलेले तिचे आई-वडील यांनी अकरावी बारावीला अनिकेत व प्रियंका शिक्षण घेत असताना त्यांच्या आई-वडिलांची तळमळ व शिक्षकांप्रती असलेला फॉलोअप, मुलांच्या करिअरची काळजी, मी स्वतः अनुभवलेली आहे.
तिला मार्गदर्शन करणारे सर्व गुरुजन यांचे खूप खूप अभिनंदनत तसेच प्रियंका हिस भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा…