महाराष्ट्र शासन, उपसंचालक आरोग्य सेवा नाशिक मंडळ यांच्या वतीने डिसेंबर २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या गट क परीक्षेत मविप्र संचलित इंस्टीट्युट ऑफ फार्मास्यूटिकल सायन्सेस, आडगाव येथील माजी विद्यार्थी जयंत शिंदे याने महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. या यशाबद्दल जयंतचा संस्थेचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य नितीन हिरे उपस्थित होते.