निवडणुकीत मतदार स्वयंसेवक म्हणून कार्य करण्याचे आवाहन
अमरावती, दि. 29 : अमरावती विधानसभा मतदार संघामार्फत तहसील कार्यालयाच्या सभागृहात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप उपक्रमाअंतर्गत नवमतदार जागृती व स्पर्धा परीक्षा मागर्दर्शन शिबीर घेण्यात आले. यावेळी मतदानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगून निवडणुकीत मतदार स्वयंसेवक म्हणून कार्य करण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी अनिल भटकर यांनी केले.
मार्गदर्शन शिबिराला नवयुकांची मोठ्या प्रमाणावर हजेरी होती. यावेळी सहायक जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी मीनू पी. एम., मुख्याधिकारी नगरपंचायत तिवसा नरेश अकनुरी, उपमुख्य कार्यापालन अधिकारी डॉ.कैलास घोडके, उपविभागीय अधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अनिल भटकर, तहसिलदार विजय लोखंडे, महानगरपालीकाचे सीडीपीओ नरेद्र वानखडे आदी उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी तसेच स्पर्धा परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षेच्या तयारीच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनीही मोठ्या प्रमाणावर प्रश्नोत्तराच्या माध्यमातून मान्यवरांशी संवाद साधला. उपमुख्य कार्यापालन अधिकारी डॉ.कैलास घोडके यांनी सर्वाना मतदानाची शपथ देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. निवासी नायब तहसिलदार सुनिल रासेकर यांनी प्रास्ताविक केले.