
नाशिक:
जन्म आणि मृत्यू प्रकृतीचा नियम आहे.आणि यामधला काळ आणि त्या काळात आपल्या कडून घडलेलं कार्य म्हणजेच कदाचित जीवन आहे.
प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात विशिष्ट योगदान देऊन आपलं जीवन सफल करत असते.आणि आपलं कर्म ही आपली ओळख ठरते.
एक स्त्री ही संपूर्ण निसर्गाची जन्मदाती आहे.नवीन जीवाला जन्म देणं त्याचं पालनपोषण करणं.प्रेम करणं, माया लावणं.ही एका स्त्रीची सुंदर भूमिका ती अत्यंत सृजनशीलतेने वठवत असते.
परंतु आता मी एका अश्या जन्मदाती विषयी बोलणार आहे.जी, मोक्ष प्राप्तीच्या मार्गा पर्यंत पोचवण्याच कार्य करते,अर्थात एक अशी स्त्री जी वयाच्या अगदी वीस एकवीस वर्षांपासून मोक्षधाम येथे अंत्यविधी करण्याचं काम करून आपलं कर्तव्य म्हणून आपल्या कुटुंबाचा सात पिढ्यांचा वारसा चालवत आहे.
नियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायो ह्यकर्मणः।
शरीरयात्रापि च ते न प्रसिद्धयेदकर्मणः ॥
भावार्थ : तू शास्त्रविहित कर्तव्यकर्म करत रहा कारण, कर्म न करण्या पेक्षा कर्म करत राहणं श्रेष्ठ आहे. तथा कर्म न केल्याने तुझा शरीर-निर्वाह पण सिद्ध होणार नाही.
या भगवत गीतेतील श्लोका द्वारे,कर्म करणं किती महत्त्वाचं आहे,हे सिद्ध होतं. सौ. सुनीता ताई पाटील यांनी देखील आपला पिढीजात व्यवसाय निर्भिडपणे निवडला आणि अविरत आपलं कार्य सुरू ठेवलं.
सौ.सुनीता ताई पाटील ह्या गोदावरी काठी वसलेल्या नाशिक जिल्ह्याच्या रहवाशी आहेत.मोक्ष धाम येथे अंत्यविधी संस्कार करणं हे कार्य सुनीता ताईचे वडील आयुष्यभर करत आले.ताई पण लहानपणा पासून त्यांचं हे काम बघत होत्या.त्यांना त्या कामा विषयी आदर भाव होता.आणि त्या देखील वडिलांना थोडी मदत करत असे.
वडील वयोवृद्ध झाल्यानंतर त्यांच्या कडून अंत्यविधी चे काम होईनासे झाले.त्यावेळी सुनीता ताईचं अत्यंत तरुण वय होतं.ती सगळी मिळून दहा भावंड आहेत.सुनीता ताई सगळ्यात लहान आहेत.सुरुवातीला त्यांचे भाऊ हे काम करत असे.नंतर त्यांना बाहेर नोकरी लागली आणि त्यांनी अंत्यविधी च काम बंद केलं.त्यावेळी वडिलांनी सुनीता ताईस हे कार्य पुढे सुरू ठेवण्यास सांगितलं.आणि मुलगा मुलगी असा भेद न करता त्यांनी आपला पिढीजात वारसा ताई कडे सोपवला. आधी पण ताई वडिलांना आणि भावांना मदत करत असे.पण मोक्षधाम येथे अंत्य विधी साठी येणारे लोकं ताईला विरोध करत असे.मग ताई हळूहळू सगळं करू लागल्या.कुठल्या ही प्रकारे मृत्यु झाला असेल आणि प्रेताची अवस्था कितीही खराब असली तरी ही प्रेत स्वच्छ पुसून घेणे,तुपाने प्रेतावर मालिश करणं,डोळे उघडे असल्यास बंद करणं,हात पाय सरळ करणं.हे सगळं ताई हिमतीने करू लागल्या.मी ताईंना विचारलं की त्यांना रात्री अपरात्री हे करताना भीती वाटत नाही का.तर यावर सुनीता ताई म्हणाल्या,”माझे वडील मला एकदा म्हणाले होते,जिवंत माणसं धोका देतात मेलेली माणसं धोका देत नाही म्हणून प्रेतांना घाबरायचं नाही.आणि म्हणून मी हा वसा हाती घेतला आणि हिमतीने मी गेली सतरा वर्ष ही सेवा करत आहे.” सुनीता ताईंच्या वडिलाचे हे विचार त्यांना अंत्यविधी चे काम करण्याची हिम्मत देतात.आपल्या कामाचा अनुभव सांगताना ताई म्हणाल्या की,कधी कधी प्रेत अत्यंत खराब अवस्थेत असतं.आत्महत्या किंव्हा अपघात झाला असल्यास प्रेत कुजलेल्या अवस्थेत असतं त्यात दुर्गंध पण असते तरी,त्याला स्वच्छ करून,तूप लावून अंत्यविधी साठी तयार करावं लागतं.आपला अनुभव सांगताना त्यांनी हे देखील सांगितलं की,प्रेत खराब अवस्थेत असतं तेव्हां त्याचे कोणी नातेवाईक, मित्र प्रेतास हात लावत नाही,आणि लांब उभे असतात.अश्यावेळी ताई एकट्याच सगळं करत असतात.आणि अग्नी देण्याचे काम पण त्यांना करावं लागतं.याबाबतीत कोणी गृहस्थ त्यांना नेहेली हिणवत असे की स्त्री असून देखील त्या असं काम करतात,परंतु ताईंनी त्याच वाईट वाटून न घेता त्यांच्या हिनवण्याने खचून न जाता आपलं काम सेवा म्हणून सुरू ठेवलं.आणि ज्या कुजलेल्या मृत शरीराला त्याच्या नातेवाईकांनी पण अग्नी देण्यास नाकारले अश्या प्रेताना स्वच्छ करून अंत्यविधी संस्कार करून अग्नी देण्याचे काम सुनीता ताई करतात.यापेक्षा मोठं पुण्यकार्य ते काय असेल.
आज कोरोना या जागतिक संकट काळात अनेक लोकं मृत्यु मुखी पडत आहेत. मोक्ष धाम मध्ये रुग्णवाहिकेतून आणली जाणारी ही प्रेतं तशीच पडली असतात.आणि कोणीही अंत्य संस्कार करण्यासाठी येत नाही.त्या प्रेतांना ताई स्वतः अग्नी देऊन अंतिम संस्कार पूर्ण करत आहेत.आणि ही अत्यंत ह्रदयस्पर्शी, मन खिन्न करणारी बाब आहे.असे पुण्यकार्य ताई आजच्या परिस्थितीत दिवस रात्र करत आहेत.किती त्रासिक मरण प्राप्त झालेलं शरीर आणि दुखावलेला आत्त्मा यांना पवित्र अग्नी संस्कार करून त्या आत्म्यांना शांती मिळेल असं हे यज्ञकर्म सुनीता ताई पाटील करत आहेत.
एक स्त्री ही जन्मदाती आहे. मरण कळा सोसून नवीन आयुष्याला जन्म देते.आपल्या गर्भात एक आयुष्य जगवते.त्या जीवाला जगात आणते त्याच संगोपन करते. सक्षमपणे आपलं मातृत्व निभवते.
इतिहास साक्ष आहे,प्रत्येक संकटाला हिमतीने तोंड देत मार्ग काढत जाणं हा स्त्रीचा गुणधर्म आहे.
सुनीता पाटील ताईनीं पण अत्यंत जबाबदारीने आपल्या कुटुंबाचा अंत्यविधी व्यवसाय सेवा म्हणून स्वीकारला आणि गेली सतरा वर्ष हे कार्य त्या तेवढ्याच निष्ठेने आणि निर्भिडपणे करत आहेत.त्यांच्या या हीमतीला मानाचा मुजरा. डॉ.राणी दुष्यंत खेडीकर
अध्यक्ष
बाल कल्याण समिती पुणे
Khup sunder satya katha . Salam sunita Patil yanchya karyala🙏
खुप छान प्रेरणादायी, हीम्मतवान, धैर्यवान स्त्री ची ओळख या लेखामधून झाली आहे. आपल्या लेखणीतून नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या महीलांची ओळख होते. डॉ. राणी दुष्यंत खेडीकर यांच्या लेखणीने अशा महीलांची ओळख होते ज्या जगावेगळे काम करतात.
जगावेगळे काम करणार्या महीलांना आपल्या लेखणीने जगासमोर आणणार्या डॉ राणी खेडीकर यांना खुप खुप शुभेच्छा..
अशोक तांगडे.
अध्यक्ष, बाल कल्याण समिती ,बीड
9325056892
एक स्त्री असुन ती कुठेच कमी पडली नाही,स्त्री ला अबला म्हटले जाते पण तीने हे काम धाडसाने केले आहे तिच्या या कार्याला सलाम