*सरनाईक समाजकार्य महाविद्यालयात बालकल्याण समितीच्या वतीने मार्गदर्शनपर कार्यक्रम*
वाशिम : श्री रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालयात दि. १९ ऑक्टोबर रोजी बालकांच्या काळजी व संरक्षणाचे हेतून जनजागर कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.
सविस्तर वृत्त असे की, सरनाईक समाजकार्य महाविद्यालयातील रॅगिंग तक्रार निवारण समिती, महिला तक्रार निवारण समिती व बालकल्याण समिती, वाशिमच्या सहयोगाने बालकल्याण समिती, वाशिम यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १९ ऑक्टोबर रोजी बालकांचे संरक्षण व काळजी, आणि महिला व बाल अत्याचार या विषयावर मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर वाहाणे होते. तर प्रमुख माग॔दश॔क म्हणून बालकल्याण समिती, वाशिमच्या अध्यक्षा डॉ. अलका मकासरे, सदस्य विनोद पट्टेबहादुर, सदस्य ऐड. अनिल उंडाळ, सदस्या
डॉ. मंजुश्री जांभरुणकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रवर्तक क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून वंदन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत तसेच मान्यवरांचा परिचय रॅगिंग समिती समन्वयक प्रा. डॉ. भारती देशमुख यांनी करून दिला . कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला तक्रार निवारण समिती समन्वयक प्रा. दिपाली देशमुख यांनी केले. कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुणे बालकल्याण समितीच्या अध्यक्ष डॉ. अलका मकासरे यांनी बालकांच्या संरक्षणाबाबतच्या विविध उपाय योजना आणि त्या संदर्भातील तरतुदी याबाबत मार्गदर्शन केले करुन भविष्यातील भारत घडविणा-या बालकांच्या न्यायीक हक्काचे रक्षण करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले. समिती सदस्य विनोद पट्टेबहादुर यांनी बालकल्याण समितीची कार्यपद्धती तसेच या कार्याचे महत्त्व समाजासाठी किती उपयोगी आहे याबद्दल माहिती देत समाजक्षेत्रातील मुलांना आपल्या आजुबाजूला किंवा परीसरात बालकांवर होत असलेल्या अन्याय-अत्याचाराची माहिती टोल-फ्री क्रमांक १०९८ वर देऊन समाजकार्यातील आपला खारीचा वाटा उचलन्याची विनंती यावेळी केली. ऐड. अनिल उंडाळे यांनी बालकांच्या संरक्षणासंदर्भातील विविध कायद्यासंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . डॉ.मंजुश्री जांभरुणकर यांनी बालकल्याण समितीच्या कार्याचा प्रसार समाज कार्यकर्त्यांनी आपल्या गावामध्ये कशा पद्धतीने करावा आणि याचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . किशोर वाहाणे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना कळकळीचे आवाहन केले की,
बालकल्याण समितीचे कार्य समाजामध्ये पोहोचवून बालहक्क जोपासण्यासाठी तळमळीने प्रभावी जनजागृती करावी. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रुती इंगळे हिने केले, तर उपस्थितीतांचे आभार मनिषा कालवे हीने मानले. कार्यक्रमास महाविद्यालयाचे डॉ. संजय साळीवकर, प्रा.पंडित नरवाडे, प्रा .गजानन बारड, प्रा. रवींद्र पवार, प्रा. जयश्री काळे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेत मोठ्या प्रमाणात उपस्थिती दश॔वीली.
Related Stories
September 24, 2024
June 17, 2024
June 17, 2024