मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या 65 व्या स्थापना दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस हे छत्रपती शिवाजी महाराज मैदान, दादर, मुंबई येथे आयोजित मुख्य शासकीय सोहळ्यात बुधवारी (दि. 1 मे) सकाळी 8 वाजता ध्वजारोहण करणार आहेत.
मुख्य शासकीय सोहळ्यानंतर राज्यपाल बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे क्रीडाभवन येथे महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यपालांचा जनतेला उद्देशून संदेश दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून 8 वाजता तसेच आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरुन सकाळी 9 वाजता प्रसारित केला जाणार आहे.