सांगली : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात लोकसभा निवडणूकीच्या पुर्वतयारी संदर्भात सांगली जिल्ह्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांची ‘कायदा व सुव्यवस्था ‘ या विषयावर उद्या सोमवार दि. २९ एप्रिल २०२४ रोजी, आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत सांगली जिल्हा माहिती अधिकारी फारुक बागवान यांनी घेतली आहे.
जिल्ह्यातील जिल्हा पोलिस प्रशासनाची निवडणुकीच्या अनुषंगाने सुरू असलेले काम, सायबर सुरक्षितता,विविध नियमावली,आदर्श आचारसंहिता काय करावे आणि करू नये,मतदानाची टक्केवारी वाढवणे यासाठी सुरू असलेले उपक्रम याविषयीची माहिती ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून सांगली जिल्हयाचे पोलिस अधीक्षक श्री. घुगे यांनी दिली आहे.