महर्षि शिंदे अध्यापक विद्यालय, नाशिकच्या प्राचार्या श्रीमती मंगला थेटे (पाटील) यांच्या सेवापूर्तीचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. प्रा.संजय कदम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. याप्रसंगी मान्यवरांचा शाल, गुलाबपुष्प व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी म.वि.प्र. संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे होते, प्रमुख पाहुणे म्हणून संचालक ॲड.लक्ष्मण लांडगे, संचालक रमेश आबा पिंगळे, शिक्षणाधिकारी डॉ. भास्कर ढोके, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रा.यशवंतराव पाटील व सदस्य प्रा.यु. आर. जाधव , मराठा हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीम.वारुंगसे , माजी प्राचार्य सौ.यु.बी. पूरकर, मविप्र सेवक सोसायटीचे संचालक श्री. बाबा मोरे, थेटे व पाटील परिवारातील सदस्य उपस्थित होते. विद्यालयाची विद्यार्थिनी कु. दुर्गा घोटे हिने प्राचार्यांच्या कार्यशैली विषयी मनोगतातून विचार व्यक्त केले. सौ.मोगल यांनी प्राचार्यांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली.
सत्कारमूर्ती प्राचार्या थेटे मॅडम यांनी आपले शालेय कामकाज करताना आलेले अनुभव व अध्यापन करताना मिळालेला आनंद अनेक प्रसंगातून व्यक्त केला. संस्थेप्रती व संस्थेतील आजी माजी सरचिटणीस, पदाधिकारी, संचालक, शिक्षणाधिकारी, गुरू, प्राचार्य,सहकारी यांचे ऋण व्यक्त केले. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रा. यशवंतराव पाटील यांनी यापुढे श्रीमती थेटे यांनी आपला उर्वरित वेळ आपले छंद जोपासण्यासाठी घालवावा यासंबंधी मार्गदर्शन केले.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी श्रीमती थेटे यांचे संघर्षमय जीवन इतरांना नेहमी प्रेरणा देत राहील. म.वि.प्र. संस्थेच्या 109 वर्षाच्या कारकिर्दीत संस्थेच्या विकासात ज्या प्राचार्यांचे व शिक्षकांचे योगदान आहे त्यात मॅडमचे नाव देखील आवर्जून घ्यावे लागेल. श्रीमती थेटे यांनी पुढील वेळ वाचन व लेखन करण्यासाठी घालविण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वर्षा मोराडे व प्रा.भगवान बाराहाते यांनी तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा.डॉ.मुकुल भोसले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. राजीव देशमुख, श्री. प्रवीण हांडगे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.