नाशिक शहरातील प्रख्यात औद्योगिक संस्था किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेड यांच्या वतीने किर्लोस्कर वसुंधरा उपक्रमांतर्गत ग्रीन कॉलेज क्लीन कॉलेज ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धे अंतर्गत महाविद्यालयातील इकोरेंजर्स विद्यार्थ्यांनी वर्षभरात महाविद्यालय स्वच्छ आणि पर्यावरण पूरक ठेवण्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबविणे अपेक्षित होते. या संकल्पनेनुसार महाविद्यालयातील एको रेंजर्स विद्यार्थ्यांबरोबरच इतर विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात अनेक प्रकारचे उपक्रम राबविले जसे वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, गोदावरी स्वच्छता अभियानातील सहभाग, क्षेत्र कार्यअंतर्गत विविध ठिकाणी स्वच्छता अभियान व वृक्षारोपण आणि संवर्धन उपक्रम तसेच फटाके मुक्त दिवाळीची शपथ घेऊन सहभाग नोंदविला. या स्पर्धेत नाशिक शहरातील २० महाविद्यालये सहभागी झाले होते. यासाठी विद्यार्थ्यांना या उपक्रमाच्या समन्वयक डॉ.प्रतिभा पगार व प्रा.सुनिता जगताप यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी राबविलेल्या विविध उपक्रमांचे सादरीकरण एम एस डब्ल्यू प्रथम वर्षाचे शुभम भालेराव आणि समीर शेख यांनी केले. सर्व महाविद्यालयांच्या उपक्रमांच्या विश्लेषणाअंती मविप्र समाजाच्या समाजकार्य महाविद्यालयास तृतीय पारितोषिक मिळाले. यासाठी समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य व मविप्र संस्थेचे शिक्षणाधिकारी डॉ.विलास देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले.महाविद्यालयाचे प्राचार्य ,प्राध्यापक आणि विद्यार्थी यांचे मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲड नितिन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षिरसागर, अध्यक्ष डॉ सुनिल ढिकले, उपाध्यक्ष विश्वास मोरे, उपसभापती डी बी मोगल, चिटणीस दिलीप दळवी व सर्व संचालकांनी अभिनंदन केले.
Related Stories
September 24, 2024
June 17, 2024