वय वर्ष फक्त १०३ ..!
Share this:
- Click to share on Twitter (Opens in new window)
- Click to share on Facebook (Opens in new window)
- Click to print (Opens in new window)
- Click to share on Pinterest (Opens in new window)
- Click to share on Pocket (Opens in new window)
- Click to share on Telegram (Opens in new window)
- Click to share on WhatsApp (Opens in new window)
छे . . ! छे . . ! मी घरून मतदान करणार नाही तर प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊनच मतदान करणार!
सांगली दि. 22 : सुशिक्षित वर्गामध्ये मतदान करण्याविषयी फारशी रुची दिसून येत नाही. मात्र अशाही स्थितीत काहीजण प्रकाशाचा किरण बनतात. असाच एक किरण …शिराळामध्ये आहे. नाव महादेव दंडगे (स्वातंत्र सैनिक ) वय वर्ष फक्त १०३.
या वयात ही देशप्रेम .. कणखरता . . जिद्द या शब्दांनी ओतप्रोत भरलेल. एक समृद्ध, सफल आयुष्य. ही गोष्ट आहे एका देशप्रेमी मतदाराची. शिराळा मतदार संघ विधानसभेला सांगली जिल्ह्याशी तर लोकसभेला कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले मतदार संघाशी जोडलेला. या मतदारसंघाची पाहणी करण्यासाठी तेथील निवडणूक निर्णय अधिकारी संजय शिंदे हे गेले होते. सोबत शिराळ्याच्या तहसीलदार श्यामला खोत या ही सोबत होत्या.
यंदा निवडणूक आयोगाने 85 वर्षांपुढील तसेच अंध मतदारासाठी विशेष बाब म्हणून घरातूनच मतदान करण्याची सोय या निवडणुकीत केली आहे. निवडणूक आयोगाच्या या मतदान उपक्रमाबाबत माहिती सांगण्यासाठी श्री. शिंदे यांनी शिराळाचा दौरा केला. यावेळेस त्यांना या ठिकाणी श्री. दंडगे नावाचे स्वातंत्र्य सैनिक (वय -103 )असल्याचे समजले. त्यांची श्री. शिंदे यांनी आपुलकीने भेट घेत घरून मतदान करण्याबाबत सुचित केले. त्यावर दंडगे यांनी स्मित हास्य करत सांगितले, छे . . ! छे . . ! मी घरून मतदान करणार नाही तर प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊनच त्या ठिकाणी मतदान करणार. त्यांची ही जिद्द पाहून निवडणूक निर्णय अधिकारी श्री. शिंदे ही क्षणभरासाठी थबकले . . . ! जर या 103 वर्षाच्या नवतरुण मतदाराचा आदर्श मतदानाकडे पाठ फिरविणाऱ्या नागरिकांनी घेतला तर ?