बुलढाणा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी सहा कोटीवर निधी वितरणास मान्यता
Share this:
- Click to share on Twitter (Opens in new window)
- Click to share on Facebook (Opens in new window)
- Click to print (Opens in new window)
- Click to share on Pinterest (Opens in new window)
- Click to share on Pocket (Opens in new window)
- Click to share on Telegram (Opens in new window)
- Click to share on WhatsApp (Opens in new window)
निधी उपलब्ध झाल्याने बाधितांना दिलासा – मंत्री अनिल पाटील
बुलढाणा दि. १ :- बुलढाणा जिल्ह्यात गतवर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिके व शेतजमीनीच्या नुकसानीच्या मदतीसाठी ६ कोटी ४७ लाख ४१ हजाराचा निधी वितरीत करण्यास मान्यता देण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने मदत देण्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याने बाधित शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असल्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी व्यक्त सांगितले.
बुलढाणा जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत अतिवृष्टीमुळे ७ हजार ८९९ शेतकऱ्यांच्या ७ हजार ५४९.५५ हेक्टर क्षेत्रावरील शेतीपिके व शेतजमीनीचे नुकसान झाले होते. या बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी अमरावती विभागीय आयुक्त यांच्याकडून निधी मागणीचा प्रस्ताव शासनास प्राप्त झाला होता. त्यानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून ६ कोटी ४७ लाख ४१ हजाराचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. ही मदत ९ नोव्हेंबर २०२३ च्या शासन निर्णयानुसार २ ऐवजी ३ हेक्टरपर्यंत मदत अनुज्ञेय करण्यात आली आहे.