ठाणे:
अत्रे कट्टा ठाणे येथे माझी भेट सौ.स्वाती बेडेकर यांच्याशी झाली.कट्ट्यावर त्या त्यांच्या सखी प्रवसा बद्दल हितगुज करण्यासाठी आल्या होत्या.अत्यंत सविस्तरपणे आणि अनेक अनुभवांचा उल्लेख करत त्या बोलत होत्या.
स्वाती बेडेकर यांनी निवडलेले क्षेत्र आणि त्यात त्यांचं काम हे आता जगभरात मान्य झालं आहे . हा प्रवास सोपा नव्हता. शिक्षणाचं काम करत असताना गुजरात मध्ये अगदी मागास भागात जावं लागत असे. शाळेत विद्यार्थिनीची संख्या कमी का? ह्याचा शोध घेत असताना ही मासिक पाळीची प्रचंड मोठी समस्या समोर आली. फक्त शाळेतल्या मुली नाहीत तर पाळी येणाऱ्या सर्व स्त्रिया ची ही समस्या आहे हे लक्षात आल . फक्त स्वच्छ कपडा किंवा पॅड देणे एवढ्याने ही समस्या संपणार नव्हती . त्यासाठी खूप मोठ्या लोक जागृतीची गरज होती. आणि त्या साठी खूप मोठ्या विचाराची गरज होती. एक एक समस्येचं समाधान शोधता शोधता कामा ला निश्चित स्वरूप येत गेलं. मग पॅड बनवण्या साठी स्त्रियांचे ग्रुप बनवायची कल्पना आली. आज त्याने मोठ्या उद्योगाचं स्वरूप घेतलं आहे.
गुजरात मध्ये राहत असल्यामुळे स्वाती बेडेकर यांचं कार्यक्षेत्र गुजरात झालं.
गुजरात महाराष्ट्रात तसा भाषेचा फरक फार मोठा नाही. साधारण बोललेल सहज समजू शकत. मराठी येणाऱ्यांना गुजराथी सहज आत्मसात करता येत. मात्र ज्या भागात काम करायचं तिथली भाषा नीट येणं अत्यंत गरजेचं आहे. नुसती पुस्तकी भाषा नाही तर बोली भाषा सुध्धा.तिथल्या चाली रिती , उत्सव, मान्यता हेही माहित असणं आवश्यक असतं .
भाषे पेक्षा हे काम अशा विषया वर की जो सगळ्यांनाच निषिद्ध वाटतो. जगातल्या कदाचित पहिल्या बाईला पाळी आली तेंव्हा पासून तिच्यावर अशुद्धीचा शिक्का बसला. ही गोष्ट स्त्रियांनीच पिढ्यानपिढ्या स्वीकारली आहे.शिककेल्या स्त्रियांनीही ही मानसिक गुलामगिरी आवडीने स्वीकारली, नाही उलट जपली. पाळी येणं ही एक साधीसुधी नैसर्गिक प्रक्रिया आहे. हयात शुद्ध अशुद्ध असण्याचा काही संबंध नाही हे पटवण हेच काम खूप मोठं होतं.
पाहिलं मोठ्ठं काम होत ते म्हणजे, स्त्रियांना ह्या विषयावर बोलायला लावणं. पण ह्या प्रवासात गावांनी झिडकारलेल्या, वेगवेगळ्या व्याधींनी ग्रस्त असलेल्या काही स्त्रिया स्वतः हुन समोर आल्या आणि कामाशी जोडल्या गेल्या. आज ह्याच स्त्रिया गावातल्या इतर बायकांना काम देत आहेत.आणि स्वतः मानाने जगत आहेत. जगाने वाईट ठरवलेल काम करून उपजीविका मिळवायची , मानान जगायचं आणि इतर स्त्रियांनाही स्वतच्या पायावर उभं राहायला शिकवायच हे काम सखिने केलं आहे. हे यश स्वाती बेडेकर यांनी मिळवलेले सगळ्यात मोठं यश आहे.
आज सखी हा ब्रँड तयार झाला आहे. भारतातला पहिला संपूर्ण जैविक नॅपकिन असण्याचा मान मिळवला आहे. भारतात सगळ्यात जास्त sanitary napkin बनवणारी युनिट उभी करण्याचा मान मिळवला आहे. नुसते नॅपकिन बनवणे नाही वापरलेले नॅपकिन नष्ट करणं तेवढंच गरजेचं आहे. त्यावरही उपाय शोधला आहे. मातीचा अशुधिनाशक हा साधा सोपा पर्याय आता गावापासून ते शहरातल्या कॉलेज मधल्या मुलींनीही स्वीकारला आहे. स्त्रियांची हॉस्टेल व मुलीच्या प्रसाधनगृह ह्यामध्ये हे अशुधिनाशक वापरले जात आहेत. सार्वजनिक ठिकाणी sanitary napkin ची वेंडींग मशीन बसवली जात आहेत. गावातल्या मुली आता मोकळेपणी ह्या विषयावर बोलत आहेत. Chemist कडे जाऊन मोकळेपणे sanitary napkin खरेदी करत आहेत. संपूर्ण नाकारलेल्या विषयात एवढी प्रगती खूपच मोठी आहे. आठ वर्षात मिळवलेले हे यश आहे.
नवीन आणि वेगळं काम करताना मोठी अडचण असते ती लोकांची मानसिकता बदलण्याची . गावातून WhatsApp group बनवून पुरुषांना ह्या विषयाची माहिती द्यायला सुरुवात केली. थोडी मनोरंजक थोडी वेगळी अशी ही पद्धत खूपच कामी आली.
जिथे पुरुषांची मदत मिळाली नाही तिथे स्त्रिया पुढे आल्या. काम करायला जागा मिळत नाही म्हंटल्यावर गावातल्या स्त्रियांनी स्वतः खोली बांधून घेतली a unit सुरू केलं. अगदी लीमखेडा सारख्या मागास भागातही एक युनिट मारुतीच्या देवळाच्या अंगणात सुखाने नांदत आहे. मारुती रायाच्या कृपेने छान काम चालू आहे. गावात सभा घ्यायच्या म्हंटल्यावर जागेची अडचण असते. सगळ्यात स्वच्छ जागा म्हणजे देऊळ. सुंदर संगमरवरी फरशा घातलेल्या असतात. तिथेच सभा घ्यायला सुरुवात केली. असा निषिध्द विषय आणि त्याची चर्चा देवळात. अगदी sanitary napkinch वाटपही ह्या देवळात केलं. काही ठिकाणी विरोध झाला . अगदी धमक्याही मिळाल्या पण अशा गोष्टींना घाबरण स्वातीच्या स्वभावात नाही. उलट अशा समस्या मुळे त्यांना पुढे जायचं बळ मिळत गेलं आहे.
ह्या कामात सर्वांना सहभागी करता यावं म्हणून मग स्वाती बेडेकर यांनी hygiene bucket challenge सारखी चळवळ चालू केली. हयात एखाद्या स्त्रीने किंवा पुरुषाने सखीची १२पाकीट विकत घेऊन कोणा अशा स्त्रीला भेट द्यायची असतात ज्याना ह्याची माहिती नाही. किंवा अस काही वापरलं नाही. परवडत नाही.आणि हे देताना पाळी विषयी पांच मिनिट त्या स्त्रीशी बोलायचं. हे १२ पाकीटांच हायाजीन बकेट आता लाखो स्त्रियां पर्यंत पोचल आहे. ह्या कारणाने लाखो लोक ह्या कामाशी जोडले गेले आहेत.
खरच काम सोप नव्हतं आणि नाही. आता तर हे सर्व भारत भर पसरलं आहे. भाषेच्या प्रदेशाच्या अडचणी आता वाटत नाहीत पण प्रत्येक नवा प्रोजेक्ट नव्या समस्या घेवून येतो. तिथल्या स्थानिक समस्या असतात. विचारांचे वेगळेपण असते. जुन्या मान्यता आणि त्याच्या सावल्या अजूनही आहेतच. पाळी चालू असली तर प्रसाद घेण्यासाठी सुध्दा अजून हात पुढे यायला धजावत नाहीत. ह्या मानसिकतेशी दोन हात करतच राहावे लागणार आहे.
स्वाती बेडेकर यांच्या कार्याला सलाम.
डॉ राणी खेडीकर
अध्यक्ष
बाल कल्याण समिती पुणे