मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सभापती श्री बाळासाहेब क्षीरसागर आणि निफाड तालुका संचालक मा श्री शिवाजी गडाख आणि इतर मान्यवरांनी नुकतीच कर्मवीर गणपत दादा मोरे निफाड महाविद्यालयास भेट दिली. याप्रसंगी त्यांनी सर्व महाविद्यालयाची पाहाणी केली, महाविद्यालयात सुरू असणाऱ्या सर्व विभागातील उपक्रमांचा, कार्यालयीन कामांचा आढावा घेतला, यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.के.शिंदे यांनी माहिती दिली, महाविद्यालयात यावर्षी नव्याने सुरू झालेल्या बी.सी.एस.सायन्स या कोर्स बद्दल सभापती क्षिरसागर यांनी आनंद व्यक्त करत आवश्यक त्यासाठी असणाऱ्या सुविधा, लॅब, हॉस्टेल याची स्वतः पाहणी करून सूचना मार्गदर्शन केले…तसेच महाविद्यालय स्तरावर विद्यार्थ्यांसाठी आणखी कोणकोणते उपक्रम हाती घेता येतील आणि ते कसे राबवावे याबद्दलही सर्व सेवकांना प्रबोधन करत, शिस्त आणि गुणवत्ता राखण्याचे आवाहन केले.शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रात निफाड महाविद्यालयाच्या खेळाडूंनी नुकत्याच पार पडलेल्या ॲथलेटिक्स स्पर्धेत अनेक क्रीडा प्रकारात नेत्रदीपक यश संपादन केले,
या विजयी खेळाडू मधून निकिता गव्हाणे, करिष्मा सानप, प्रतीक्षा खापरे, प्रीती ढवळे, ज्योती खरात या खेळाडूंची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे येथे होणाऱ्या आंतर विभागीय स्पर्धेसाठी नाशिक विभागाकडून निवड करण्यात आली. त्याबद्दल विजयी खेळाडूंचे म.वि.प्र. समाज संस्थेचे सभापती बाळासाहेब रामनाथ क्षीरसागर, संचालक शिवाजी अप्पासाहेब गडाख, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. के. शिंदे, उपप्राचार्य प्रा. ए. एल. गायकवाड, क्रीडा संचालक एल. एम. गळदगे, क्रीडा संचालक चेतन कुंदे, प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी तसेच प्राध्यापकेतर कर्मचारी यांच्याकडून सदर विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या….