
नाशिक:
महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च महाविद्यालय पंचवटी नासिक येथील संचालक डॉ. गणेश तेलतुंबडे यांनी संन २०२२-२३ प्रवेशित एमबीए विद्यार्थ्यां च्या करिता १४ ते १९ नोव्हेंबर इंडक्शन प्रोग्रॅमचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यां करिता एआयसीटीने विहित केलेल्या नियमानुसार आणि मॉड्युल्सनुसार सहा दिवसीय इंडक्शन प्रोग्रॅम आयोजन करण्यात आले होते. या प्रोग्राम मध्ये इनोव्हेशन इन मॅनेजमेन्ट या थिम वर क्षेत्र भेट, टेम्पल मॅनॅजमेण्ट, आथिर्क साक्षरता, सायबर सुरक्षा, भारतीय संविधानाची ओळख, व्यावसायिक शिष्टाचार, संभाषण कौशल्य, शारीरिक तंदुरुस्ती व मानसिक आरोग्य, मॅनेजमेंट गेम्स अशा विविध कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले होते.
या मध्ये पहिल्या दिवशी प्रतिनिधी स्वरूपात श्रीस्वामी नारायाण मंदिराला क्षेत्रभेट दिली. मंदिराचे जनसंपर्क अधिकारी श्री अमित पटेल यांनी टेम्पल मॅनेजमेंट बाबत सखोल मार्गदर्शन केले.
दुसऱ्या दिवशी लाईफ स्किल या विषयावर डॉ. श्रद्धा रारावीकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदशन केले संवाद कौशल्य, जीवन कौशल्य, तणाव व्यवस्थापन, आणि जीवनातील आव्हाने कशी स्वीकारावी याविषयी छोट्या छोट्या कथांच्या मदतीने चर्चा केली. तसेच स्नेहा घाटुरे यांनी बिझनेस एटिकेट्स मॅनर्स अँड पर्सनल ग्रूमिंग या विषयावर संवाद साधला.
तिसऱ्या दिवशी विस्डम एक्स्ट्रा नाशिकच्या श्रीमती गौरी गीत यांनी आर्थिक जागरूकता व गुंतवणूक या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदशन केले. या मध्ये त्यांनी गुंतवणूक कशी करावी व का करावी त्याचे फायदे तोटे व त्या मधील जोखीम असे विविध पैलू विद्यार्थ्यांना समजून सांगितले.
चौथ्या दिवशी प्रा. प्रिया गायकवाड यांनी मानवी हक्क व भारतीय संविधान याचे सविस्तर रित्या विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. त्याकरता प्रा. प्रिया यांनी सध्या देशांमध्ये घडत असलेल्या वेगवेगळ्या केसेसचा संदर्भ विद्यार्थ्यांना दिला.
प्रा. निखिल सायबर सुरक्षा बाबत माहिती देताना फ्रॉड कसे होतात हे उदाहरणसह समजावून सांगितले.
पाचव्या दिवशी प्रसिद्ध सूत्रसंचालक तसेच मोटिवेशनल स्पीकर श्री. रोहन मेहता यांनी गोल सीटिंग, मोटिवेशन, आपले धेय्य स्वयं प्रेरीरत होऊन कशे सध्या कराचे विविध उदाहरणे देऊन या संदर्भात आपले मनोगत यक्त केले. तसेच अशोका डिस्कव्हर चा डॉक्टर हर्षदा देसाई आरोग्य विषयी जागरूकता या विषयवार विद्यार्थ्यांनशी सवांद साधला.
शेवटचा सहाव्या दिवशी श्री कपिल रेलन यांनी डिसिप्लिन ऑफ लीडर्स या विषयावर विद्यार्थ्यांनी सवांद साधला. कॉन्फ्लिक्ट रिझोल्यूशन स्किल्स, लीडरशिप स्किल्स आणि यशस्वी लीडर होण्यासाठी जबाबदारी घेणे कसे महत्त्वाचे आहे याबद्दल सांगितले. मन,शरीर आणि वाणी या शिस्त आत्मविकासात कशी महत्त्वाची भूमिका बजावतात यावर त्यांनी भर दिला. महाविद्यालयाचे संचालक डॉ. गणेश तेलतुंबडे विद्यार्थ्यांशी संवाद साधत वर्षभरात अजून कुठले नवनवीन उपक्रम महाविद्यालयामार्फत घेण्यात येणार आहेत याची तपशीलवार माहिती विद्यार्थ्यांना दिली. संपूर्ण कार्यक्रमासाठी शैक्षणिक विभागप्रमुख डॉ. जयश्री भालेराव यांचे सहकार्य लाभले तसेच कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर यांनी प्रयत्न केले.