नाशिक:
नाशिक येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित लोकनेते व्यंकटराव हिरे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील पदव्युत्तर अर्थशास्त्र विभाग, संशोधन केंद्र आणि आय. क्यू. ए. सी. यांच्या वतीने आज दिनांक 23 नोव्हेंबर 2022 रोजी एम. ए.प्रथम वर्ष अर्थशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांच्या उद्बोधन वर्गाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे यांच्या हस्ते संपन्न झाले. विद्यार्थ्यांनी सकारात्मक व व्यापक दृष्टिकोन ठेवून ज्ञान संपादन केल्यास जीवनात हमखास यश मिळते असे प्रतिपादन यावेळी मा. प्राचार्य यांनी केले.
याप्रसंगी महाविद्यालयातील राष्ट्रीय मूल्यांकन व प्रमाण परिषदेचे (NAAC) समन्वयक प्रा. डॉ. विष्णू आडोळे यांनीआय. क्यू. ए. सी. व नॅक चे महत्व, भूमिका व प्रक्रिया समजावून दिली. तसेच नॅक प्रक्रियेतील विद्यार्थ्यांचा सहभाग व भूमिका याबद्दल विद्यार्थ्याना अवगत केले. महाविद्यालयातील संशोधन केंद्रे, सर्टिफिकेट कोर्सेस, महाविद्यालयाच्या कामकाजाची पद्धती, इत्यादी बद्दल डॉ. अडोळे यांनी सविस्तर माहिती दिली.
अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. ना.ना. गाढे यांनी अर्थशास्त्र विभागाची कार्यपद्धती व विभागात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला.
याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. के. एच. कापडणीस उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आशा पाटील यांनी केले. प्रास्ताविक प्रा. डॉ. ना. ना. गाढे यांनी केले आणि प्राध्यापिका सुजाता आहेर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी अर्थशास्त्र विभागातील डॉ. रूपाली देवरे, प्रा. पुनम ब्राह्मणकर यांनी सहकार्य केले. याप्रसंगी दहा विद्यार्थ्याचे प्रातिनिधिक स्वरूपात स्वागत करण्यात आले. एम. ए. प्रथम वर्षात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या कु. राणी रमेश गुंजाळ या विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आला. उद्बोधन वर्गात विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
Related Stories
September 24, 2024
June 17, 2024
June 17, 2024