पुणे :- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते सेंटर फॉर इंटिग्रल स्टडीज अँड रिसर्च संस्थेतर्फे प्रकाशित ‘एकात्म मानव दर्शन-संकल्पना कोश’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. जीवनाच्या विविध क्षेत्रात एकरूपता आणून भारताचा विश्वकल्याणाचा शाश्वत विचार जगाला देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे श्री.कोश्यारी यावेळी म्हणाले.
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत झालेल्या या कार्यक्रमाला दत्तात्रय होसबळे, नंद कुमार, रवी देव, प्रशांत साठे आदी उपस्थित होते.
राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले, पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांनी एकात्म मानववाद शब्दाचा उपयोग केला. समग्र जगाच्या कल्याणासाठी सर्व विचारांच्या साररूपाने हा विचार मांडला आहे. भारताचा जगतकल्याणाचा विचारच शाश्वत विचार आहे. आपली या विचारावर दृढ श्रद्धा असली तर जगाला मानवकल्याणाचा संदेश प्रभावीपणे देत येईल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी श्री.होसबळे यांनीही आपले विचार व्यक्त केले. ग्रंथाचे संपादक रवींद्र महाजन यांनी ग्रंथ निर्मितीतील विविध टप्प्यांची माहिती दिली.
सीआयएसआरच्या हरिभाऊ मिरासदार यांनी प्रास्ताविकात ग्रंथलेखनाच्या उद्देशाविषयी माहिती दिली.
ग्रंथ लेखनात योगदान देणाऱ्या लेखकांपैकी काहींचा प्रातिनिधिक स्वरूपात यावेळी राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.