औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पैठण येथील श्रीक्षेत्र एकनाथ महाराज मंदिरास भेट देऊन श्री संत एकनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले.
दर्शनानंतर विश्वस्त मंडळाच्यावतीने शाल,श्रीफळ, एकनाथ महाराजांची मूर्ती आणि ग्रंथ देऊन मुख्यमंत्री शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी नाथ वंशज हरी पंडित गोसावी, मिलिंद बुवा गोसावी, रघुनाथ बुवा गोसावी पालखीवाले, रोहयो मंत्री संदीपान भुमरे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री संजय राठोड, कार्यकारी विश्वस्त दादा पाटील बारे, विश्वस्त श्री चनगटे महाराज, गणेश मोहिते आदी यावेळी उपस्थित होते.