मुंबई : ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ (द्वितीय) यांचे दुःखद निधनामुळे भारत सरकारने दि. 11 सप्टेंबर, 2022 रोजी संपूर्ण देशभर दुखवटा जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या वतीने रविवार दि.11 सप्टेंबर, 2022 रोजी मुंबई, राजभवन येथे आयोजित केलेला भारताचे सरन्यायाधीश श्री. उदय उमेश लळीत यांचा सत्कार समारंभ पुढे ढकलण्यात आलेला आहे, असे अवर सचिव, सामान्य प्रशासन विभाग (राजशिष्टाचार) यांनी कळविले आहे.
Related Stories
September 6, 2023