मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दिल्लीकडे प्रयाण झाले.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, उच्च व तंत्र आणि संसदीय कार्य मंत्री चंदकांत पाटील, शालेय शिक्षण मंत्री गिरीष महाजन, वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार आशिष शेलार, आमदार प्रवीण दरेकर, आमदार संजय कुटे, आमदार श्रीकांत भारतीय, माजी मंत्री विनोद तावडे, पोलीस महासंचालक, मुंबई पोलीस आयुक्त, राजशिष्टाचार विभागातील अधिकारी, उपनगरच्या जिल्हाधिकारी आदी उपस्थित होते.