मुंबई:- भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वर्षा शासकीय निवासस्थान प्रांगणात ध्वजारोहण झाले.
याप्रसंगी उपस्थित पोलीस पथकाने राष्ट्रध्वजास सलामी दिली. सोहळ्यास मुख्यमंत्र्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती लता शिंदे, पर्यटन व कौशल्य विकास, उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
ध्वजारोहण समारंभानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते स्टार्टअप व नाविन्यता यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी यात्रेत सहभागी रथाचे उद्घाटन केले, तसेच रथास झेंडा दाखवून मार्गस्थ केले.