मुंबई – स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई उच्च न्यायालयात ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, पोलिस महासंचालक रजनीश सेठ, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती आदी मान्यवर उपस्थित होते.