
नाशिक : यशवंतराव चव्हाण आणि अॅड. बाबूराव ठाकरे यांना अभिवादन करताना मुख्याध्यापिका पुष्पा लांडगे. समवेत शिक्षकवृंद व विद्यार्थी.
नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वाघ गुरुजी बाल शिक्षण मंदिरमध्ये महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण तसेच मविप्र संस्थेचे माजी सरचिटणीस व अध्यक्ष अॅड. बाबूराव ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पा लांडगे यांनी भूषविले. त्यांच्या हस्ते प्रतिमापूजन व पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
व्यासपीठावर ज्येष्ठ शिक्षिका कल्पना पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. उपशिक्षिका वर्षा ठाकरे यांनी सूत्रसंचालन केले. यशवंतराव चव्हाण यांच्याविषयी उपशिक्षिका प्रिया भदाणे यांनी माहिती सांगितली तसेच अॅड. बाबूराव ठाकरे यांच्या जीवन कार्याविषयी माहिती उपशिक्षिका सोनाली होळकर व सुनील पालवी यांनी सांगितली. अध्यक्षीय मनोगतात मुख्याध्यापिका पुष्पा लांडगे यांनी यशवंतराव चव्हाण व अॅड. बाबूराव ठाकरे यांच्या जीवन कार्याविषयी अनमोल अशी माहिती सांगितली. कलाशिक्षिका बोनाटे यांनी आकर्षक चित्र रेखाटले होते. या कार्यक्रमात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी सहभागी झाले होते.