
नाशिक : वणी येथील आदर्श इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये कर्मवीर ॲड. बाबूराव ठाकरे यांना अभिवादन करताना शिक्षकवृंद.
विद्यार्थ्यांना रुबिक क्यूब सोडविण्याचे प्रशिक्षण
वणी : मविप्र संचलित वणी येथील आदर्श इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये कर्मवीर ॲड. बाबूराव ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त गणिताच्या सहशिक्षिका पूजा बस्ते यांनी विद्यार्थ्यांना रुबिक क्यूब सोडविण्याचे प्रशिक्षण सुरू केले. सर्वप्रथम मुख्याध्यापिका एस. डी. काळे, सर्व शिक्षकवृंद यांनी ॲड. बाबूराव ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन केले. इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनी कु. चारुशीला पागे व साक्षी लगरे या विद्यार्थिनींनी आपल्या भाषणाद्वारे ॲड. बाबूराव ठाकरे यांचे व्यक्तिमत्व विद्यार्थ्यांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. कु. गौरव आहेर व तन्मय परदेशी यांनी सूत्रसंचालन केले. त्यानंतर मुख्याध्यापिका यांच्या परवानगीने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.