
हैदराबाद येथील राष्ट्रीय अबॅकस परीक्षेमध्ये यश
नाशिक : इंडियन ऑलिम्पियाडच्या वतीने हैदराबाद येथे घेण्यात आलेल्या खुल्या गटातील अबॅकस राष्ट्रीय परीक्षेत घवघवीत यश मिळवित मविप्रच्या वाघ गुरूजी बाल शिक्षण मंदिरमधील ३५ पैकी ३२ विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय पातळीवरील परीक्षेसाठी निवड झाली आहे.
यामध्ये विद्यार्थ्यांना ५ मिनिटांत १०० गणिते सोडवायची होती. १३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत (१०० गुण), ६ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत (९९ गुण), ४ विद्यार्थी तृतीय श्रेणीत (९८ गुण) उत्तीर्ण झाले. ९ विद्यार्थ्यांनी ९१ च्या पुढे गुण मिळवून विशेष प्रावीण्यासह यश संपादन केले. या विद्यार्थ्यांना मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, संचालक ॲड. लक्ष्मण लांडगे, शिक्षणाधिकारी डी. डी. जाधव, मुख्याध्यापिका पुष्पा लांडगे, आय जिनियस अबॅकस अकॅडमीच्या प्रमुख नीता पवार, ज्येष्ठ शिक्षिका पाटील, जाधव यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या विद्यार्थ्यांना अबॅकस शिक्षिका अनिता पवार, हर्षदा पाटील, रोहिणी सावकार, श्वेता देशमुख, वैष्णवी निकम, प्रणिता निकम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.