सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्रकार : लिहिले एकाने मात्र पुस्तकावर दुसऱ्याचेच नाव
पुणे:विद्येचे माहेरघर’ अशी ख्याती असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दूरस्थ शिक्षण विभागाच्या पदवी स्तरावरील अभ्यासक्रमात द्वितीय वर्षाच्या (एसईसी) पेपरसाठीच्या पुस्तकाचे लेखन एकाने केले आणि तेच पुस्तक मराठीच्या द्वितीय वर्ष अभ्यासक्रमाच्या पेपरसाठी लागू करताना पुस्तकावर नावे दुसऱ्याचीच छापल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. यावर प्रकाशकाने तयार केलेल्या स्वयं अध्ययन साहित्याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रकाशकाची असल्याचे लेखिकेला पत्राद्वारे कळवून विद्यापीठाने हात वर केले आहेत. सर्वस्वी जबाबदारी प्रकाशकाची असेल तर मग प्रकाशनाद्वारे काढलेल्या पुस्तकावर विद्यापीठाचे नाव व लोगो का वापरू देण्यात आला, भोर यांनी उपस्थित केला आहे. चार महिने या प्रश्नांचा पाठपुरावा करूनही भोर यांना समाधानकारक उत्तरे मिळालेली नाहीत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सर्वांना शिक्षण मिळावे, या हेतूने दूरस्थ शिक्षण विभाग सुरू करण्यात आला आहे. या विभागाच्या पदवी स्तरावरील अभ्यासक्रमात द्वितीय वर्षांसाठी (एसवायबीए-एसईसी) अभ्यासक्रम ठेवण्यात आला आहे. विद्यापीठाच्या नियमित अभ्यासक्रमाची २०२०ला क्रेडिट पॅटर्न नुसार पुनर्रचना होऊन हाच पेपर द्वितीय वर्ष मराठी वर्गासाठी ठेवण्यात आला आहे .प्रशांत पब्लिकेशन जळगाव यांच्या मागणीनुसार, प्रा. डॉ उज्ज्वला भोर यांनी या पेपरसाठी याच शीर्षकाच्या पुस्तकाचे लेखन करून दिले. मात्र त्यांचे हेच पुस्तक दूरस्थ शिक्षण विभागासाठी लेखिका उज्ज्वला भोर यांची लेखी वा तोंडी परवानगी न घेता, त्यांच्या पुस्तकाचा संदर्भात उल्लेख न करता पुण्यातील गरवारे कॉलेजच्या मराठी विभागप्रमुख डॉ. वर्षा तोरडल व धुळे येथील प्रा. डॉ. मोर संतोष नेरकर यांनी आपल्या नावे दिल्याचा आरोप प्रा. डॉ. उज्ज्वला भोर यांनी केला आहे. डॉ. भोर यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी कुलगुरू व दूरस्थ शिक्षण विभागाच्या संचालकांना पत्राद्वारे तक्रार केली
विद्यापीठाने झटकले हात
विद्यापीठाच्या मुक्त व दूरस्थ अध्ययन प्र-शाळा या विभागामधील विद्यार्थ्यांना प्र-शाळेमार्फत स्वयंअध्ययन साहित्य उपलब्ध करून देण्यात येते. प्र-शाळेसाठी स्वयंअध्ययन साहित्य विकसित करणे व त्याची छपाई करून देण्याचे कंत्राट विकास पब्लिशिंग हाऊस प्रा. लिमिटेड नॉयडा ( उ.प्र) यांना देण्यात आलेले होते. प्रकाशकाने तयार केलेल्या स्वयंअध्ययन साहित्याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रकाशकांची आहे. स्वयंअध्ययन साहित्य विकसित करताना लेखकांची नेमणूक करणे, त्यांच्याकडून साहित्याचे लिखाण करून घेणे इ. कोणत्याही कामामध्ये विद्यापीठाचा किंवा दूरस्थ अध्ययन प्र-शाळेचा सहभाग नसतो, असे विद्यापीठाच्या मुक्त व दूरस्थ अध्ययन प्र-शाळाच्या संचालकांनी प्रा. उज्वला भोर यांना पत्राद्वारे कळविले आहे.
डॉ. मोरेश्वर नेरकर यांनी चूक केली मान्य ‘प्रकाशन व्यवहार, संपादन आणि उपायोजित लेखन कौशल्य या
पुस्तकाचे लेखक डॉ. मोरेश्वर नेरकर यांनी चूक मान्य करणारे पत्र आपल्याला पाठविले आहे. प्रा. डॉ. वर्षा तोडमल यांनीही याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच मे विकास पब्लिशिंग हाऊस प्रा. लि. यांना या प्रकरणाची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याबाबत सूचना देण्यात आलेली आहे, असेही भोर यांना पाठवलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यावर लेखकांनी चूक मान्य करूनही पुढील कार्यवाहीबाबत का होत नाही? असा प्रश्न डॉ. भोर यांनी उपस्थित केला आहे.पंचवीस-तीस वर्षांपूर्वी पुणे विद्यापीठातील रसायनशास्त्राचे प्राध्यापक डॉ.हेगडे व सूक्ष्मजीव शास्त्राचे प्राध्यापक डाॅ.पाटोळे यांना वाङमयचौर्य केल्याबद्दल तात्काळ नोकरीतून काढून टाकले होते. याचा संदर्भ घेऊन योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी होत आहे .
प्रा.डॉ.वर्षा तोडमल यांनी पुणे विद्यापीठातून बी.ए. इंग्लिश व एम.ए.इंग्लिश पूर्ण केल्यानंतर थेट मराठी विषयात अहमदनगर यथील पेमराज सारडा महाविद्यालयातील मराठी विभागातून पी.एचडी. संपादन केली. पदवी व पदव्युत्तर या दोन्ही स्तरावर मराठी विषयाचे कोणत्याही प्रकारचे अधिकृत अध्ययन न करता त्यांनी थेट मराठी विषयातील पी.एच.डी प्राप्त केल्यानंतर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची एम.ए. मराठी संपरेषण ही पदव्युत्तर पदवी पूर्ण केली.ही पदवी रेग्युलर एम.ए.समकक्ष नसूनही तसे भासवून त्यांनी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी,पुणे , आबासाहेब गरवारे महाविद्यालय, पुणे व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, व तसेच महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण विभाग या सर्वाना त्यांच्या खऱ्या शैक्षणिक अर्हतेबददल अनभिज्ञ ठेवून व तसेच त्यांची
दिशाभूल करून वरिष्ठ महाविद्यालयातील मराठी विषयाच्या सहयोगी प्राध्यापक व विभाग प्रमुख पदापर्यंत पोचण्यात यश प्राप्त केले आहे.विहित शैक्षणिक अर्हता नसतांना फसवेगिरी करून एवढ्या मोठ्या पदापर्यंत पोचण्याची मजल गाठलेल्या या प्राध्यापिकेची खरी शैक्षणिक अर्हता, विद्यापीठ निवड समितीचा अहवाल, विद्यापीठ मान्यता पत्र, व तसेच CAS अंतर्गत पदोन्नतीची प्रक्रिया व त्यावेळेस तपासलेले त्यांच्या शैक्षणिक अर्हतेचे सर्वच दस्तऐवज पुन्हा एकदा कसून तपासून त्यांची नियुक्ती नियमबाह्य असल्याची सत्यासत्यता करून घ्यावी व आतापर्यंत त्यांच्या पगारापोटी शासनाची झालेली व यापुढे होणारी कोट्यावधी रुपयांची फसवणूक तात्काळ थांबवून या प्रकरणातील सर्व दोषी मंडळींवर तात्काळ कारवाई करणे अत्यावश्यक आहे अशी शिक्षणक्षेत्रातील सर्व न्यायनिष्ठ लोकांची मागणी आहे. प्रा.डाॅ.वर्षा तोडमल यांची मूळ शैक्षणिक अर्हता संशयास्पद व विवादित आहे हे ज्ञात असूनही एकमेकांशी संगनमत करुन नियमबाह्य रित्या नियुक्ती करवून घेण्याचे दु:साहस करणारे संस्थाचालक, तत्कालीन प्राचार्य, प्रबंधक, निवड समितीचे सदस्य, नियुक्तीला मान्यता देणारे सावित्रीबाई पुणे विद्यापीठातील तत्कालीन अधिकारी व महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण विभागाचे तत्कालिन संचालक व सहसंचालक या सर्व हितसंबंधी दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरातील नामांकित महाविद्यालयात व विद्यापीठात अशा प्रकारच्या नियमबाहय व अशोभनीय घटना घडणे हे खचितच लांछनास्पद आहे.या गंभीर प्रकरणाची निष्पक्षपाती व न्याय्य चौकशी करून सर्व संबंधितावर ताबडतोब कारवाई न झाल्यास नोकरी मिळवण्यासाठी धडपड करणाऱ्या सर्व विहित शैक्षणिक अर्हताधारक बेरोजगार युवक व युवती तर्फे मोठे आंदोलन छेडले जाईल असा निर्वाणीचा इशारा देण्यात येत आहे.