मुंबई : राज्यपाल रमेश बैस यांनी बुद्धपौर्णिमेनिमित्त राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
भगवान बुद्धांनी दिलेली अहिंसा, शांती व करुणेची शिकवण व्यक्तींना, समाजाला तसेच राष्ट्रांना नेहमीच मार्गदर्शक आहे. आज ही शिकवण पूर्वीपेक्षा अधिक प्रासंगिक आहे.
बुद्धपौर्णिमेच्या मंगल प्रसंगी मी भगवान बुद्धांना त्रिवार वंदन करतो व सर्वांना बुद्धपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपाल श्री. बैस यानी आपल्या संदेशात म्हटले आहे.