नाशिक: भारत सरकार नवी दिल्ली यांचेमार्फत
Inspiring India In Research innovation and STEM Education(irise) प्रकल्पांतर्गत गणित व विज्ञान विषयाच्या शिक्षकांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर आणि भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था (आयसर ) पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांनी चिकित्सक आणि सृजन शील विचार करावा नवनवीन गोष्टीचा शोध घ्यावा आणि प्रयोग करून पहावा या हेतूने राज्यातील विज्ञान आणि गणित विषयाचे अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना 10 दिवसाचे प्रशिक्षण 18मे ते28मे दरम्यान आय सर पुणे येथे संपन्न झाले त्यात नाशिक जिल्ह्यातून वरिष्ठ अधिव्याख्याता श्रीमती डॉ भारती बेलन मॅडम ,श्री पी आर करपे डूबेरे ता सिन्नर,श्री डी जी वाणी पिंपरखेड ता दिंडोरी श्री व्ही पी खैरनार लाडची ता नाशिक यांची innovation champion म्हणून निवड झाली शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना संशोधनाची संधी उपलब्ध होईल