मराठा विद्या प्रसारक समाजाचे कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालयास दि.३१ मार्च २०२४ रोजी “कृषिभूषण महाराष्ट्र एफ .पी. ओ स्टार्टअप फेडरेशन यांच्यातर्फे दिला जाणारा राष्ट्रीय पातळीवरील “कृषिभूषण एक्सलन्स अॅवार्ड -२०२४” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बापूसाहेब भाकरे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापकांचा स्मृतिचिन्ह ,प्रमाणपत्र आणि सुवर्ण पदक देउन सन्मान करण्यात आला.
कृषी महाविद्यालयाने गेल्या वर्षांपासून कृषी शिक्षण क्षेत्रात तसेच शेतकऱ्यांसाठी केलेल्या विस्तार कार्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महाविद्यालयास हा पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच महाविद्यालयाची गुणवत्ता, महाविद्यालयाने आयोजित केलेल्या विविध प्रशिक्षण कार्यक्रम ,शेतकरी मेळावे आयोजित करून विद्यार्थी व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या महाविद्यालयातून बाहेर पडलेले अनेक विद्यार्थी कृषी उद्योजक ,प्रगतशील शेतकरी तसेच प्रशासकीय सेवेत आपले कार्य करत आहे.महाविद्यालयाच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला
या कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर श्री.सुनील पवार माज़ी संचालक पणन मंडळ,महाराष्ट्र व व्यवस्थापकीय संचालक ,मार्केटिंग बोर्ड ,महाराष्ट्र, श्री मोहन वाघ, विभागीय कृषी सहसंचालक ,नाशिक विभाग ,श्री.प्रशांत महाजन ,मराठी हिंदी अभिनेते,श्री.शिवाजी डोळे ,चेअरमन व्यंकटेश्वरा कॉ-ऑप पॉवर व अॅग्रो प्रोसससिंग ली.,सौ..ज्योती सुरासे भारतीय कृषक समाज,नवी दिल्ली हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन श्री भूषण निकम व सौ.रोहिणी पाटील यांनी केले.
कृषी महाविद्यालयास सदर पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे, अध्यक्ष डॉ सुनील ढिकले,सभापती श्री बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे, चिटणीस दिलीप दळवी, उपसभापती डी बी मोगल, संचालक ॲड.लक्ष्मण लांडगे,संचालक रमेश आबा पिंगळे,संचालक मंडळ, शिक्षणाधिकारी डॉ अजित मोरे यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच सर्व सेवकांचे व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.