मराठा विद्या प्रसारक समाज संचलित, महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी, संलग्न कृषि तंत्रनिकेतन नाशिक येथील प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेट यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ व कृषि विज्ञान केंद्र नाशिक येथे आयोजीत करण्यात आली होती.
सदर भेटीप्रसंगी कृषि विज्ञान केंद्र नाशिक येथील सहाय्यक प्राध्यापक श्री.मंगेश व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाद्वारे कृषि सहाय्यक श्री.निकम सर यांनी विद्यार्थाना प्रक्षेत्रावरील प्रात्यक्षिके आणि वेगवेगळ्या प्रकल्पाची माहिती दिली.उद्यान विद्या विभागाच्या प्रक्षेत्रावर श्री.निकम सर यांनी प्रक्षेत्रावरील आंबा, पेरू,चिक्कू, फणस,आवळा फळ झाडाबद्दल माहिती देतांना सांगितले की ‘ आंबा या फळाची उत्पादन विक्री करण्या पेक्षा त्यापासून जास्तीत जास्त रोपे तयार करून अधिक फायदा होऊ शकतो हे लक्षात आणून दिले. गांडूळ खत प्रकल्पात गांडूळ खत निर्मितीत इसिनियाफेटिडा या प्रजातीच्या गांडूळापासून अधिकाधिक गांडूळ खत जलद गतीने तयार होते हि माहिती दिली.
श्रीम.सावकार मॅडम यांनी विद्यार्थांना प्रक्षेत्रावर पिकाची लागवड केल्यानंतर जैविक किड नियंत्रण कसे करावे तसेच सोडोमोनस,ट्रायकोडर्मा,बॅसिल, रायझोबियम, अझाटोबँक्टर हे बॅक्टरीया कसे वापरतात याचे सविस्तर मार्गदर्शन केले.शैक्षणिक भेटीची सांगता कृषि तंत्रनिकेतनच्या प्राचार्या श्रीम.ए.एस.पटवर्धन यांच्या आभार प्रदर्शनाने झाली. त्यांनी कृषि विज्ञान केंद्राचे श्री.व्यवहारे मंगेश (कृषि सहाय्यक) श्रीम.सावकार मॅडम आणि श्री.निकम सर यांचे आभार मानले.