सीईटी मुदतवाढीची सविस्तर माहिती परीक्षा कक्षेचे अधिकृत संकेतस्थळ https://www.mahacet.org वर उपलब्ध करण्यात आली आहे.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (CET Cell) शैक्षणिक वर्षे २०२४-२५ करीता (Academic Year 2024-25) पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी (Graduate Post Graduate Course) राज्य सामाईक प्रवेश परीक्षा महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर विविध परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षांकरता आता पुन्हा एकदा मुदतवाढ (Date Extension) देण्यात आली आहे. याबाबतची सविस्तर माहिती (Detail information) परीक्षा कक्षेचे अधिकृत संकेतस्थळ (Official website) https://www.mahacet,org वर उपलब्ध आहे.
उमेदवारंच्या नोंदणी डाटाची तपासणी केली असता अनेक उमेदवरांचे अर्ज अपूर्ण असल्याचे आढळून आले आहेत. तसेच अनेक उमेदवार व पालकांकडून CET अर्ज भरण्याच्या दिनांकात मुदतवाढ मिळावी, यासाठी विनंती या कार्यालयास प्राप्त झालेली आहे. त्यामुळे उमेदवारांच्या शैक्षणिक हिताचा विचार करुन ऑनलाइन CET परीक्षेकरीता नोंदणीस पुन्हा एकदा मुदतवाढ करण्यात आली आहे.
नवीन वेळापत्रक खालीलप्रमाणे असेल
१) महा-बीएड, एमएड (३ वर्षे एकात्मिक) सीईटी २०२४, २) महा-एमएड सीईटी २०२४, ३) महा-एमपी एड सीईटी २०२४, ४) महा-बी.एड (नियमित व विशेष) बी. एड इएलसीटी सीईटी २०२४, ५) महा-बी.पी.एड सीईटी २०२४, ६) महा-एमबीए/एमएमएस सीईटी २०२४, ७) महा-एमआर्च सीईटी २०२४, ८) महा-एम.एचएमसीटी सीईटी २०२४, ९) महा-एमसीई सीईटी २०२४, १०) महा-बी.डिझाईन सीईटी २०२४, ११) महा-बी.एचएमसीटी सीईटी २०२४ या सर्व परीक्षांच्या अर्जाचा प्रारंभ १० जानेवारी २०२४ झाला. त्याची शेवटची तारीख ही ६ फेब्रुवारी होती, मात्र त्यामध्ये आता मुदवाढ झाली असून वरील सर्व परीक्षांची अंतिम तारीख १२ फेब्रुवारी २०२४ ही असणार आहे.
यापुढे कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे परीक्षा कक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सदरील परीक्षांसाठी ऑनलाइन अर्ज कसा भरायचा, नोंदणी वेळापत्रक माहिती पुस्तिका राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळवर https://www.mahacet.org उपलब्ध करुन देण्यात आली आहे.