मविप्र समाज संचलित राजर्षी शाहु महाराज पॉलिटेक्निकमध्ये अंतिम वर्षाच्या माहिती व तंत्रज्ञान आणि संगणक विभागातील विद्यार्थ्यांसाठी प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित करण्यात आला होता. या ड्राईव्ह मध्ये महाविद्यालयातील सुमारे ७० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला, पैकी ०८ विद्यार्थ्यांची निवड या कंपनीमध्ये झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत पाटील यांनी दिली.
Innovation Hub Services Pvt. Ltd नाशिक हि एक जागतिक दर्जाची बहुराष्ट्रीय कंपनी आहे. या कंपनीने दिनांक ३० जानेवारी २०२४ रोजी महाविद्यालयात मुलाखतीचे आयोजन केले होते. निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना वार्षिक १.८० लाख रुपयाचे पॅकेज मिळणार आहे.या कॅम्पस ड्राईव्हसाठी प्राचार्य प्रा.प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.गौरव हांडगे व प्रा.अजित पाटील यांनी काम पाहिले.
सदर निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्याचे मविप्र समाज संस्थेचे सरचिटणीस अॅड.नितीन ठाकरे, अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वास मोरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर,उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी तसेच सर्व संचालक मंडळ, शिक्षणाधिकारी डॉ.डी.डी.लोखंडे यांनी अभिनंदन केले.