प्रिय…… निशु ताई
निशु ताई तुम्ही म्हणजे
एक सुगंधी झरा, सौंदर्य, बुध्दी आणि सामाजिक जाण याचा सुरेख मिलाफ.
सालस,सोज्वळ,देखणं रुप आणि करुणामय,प्रेमळ,गोड स्वभाव, म्हणून तर तुमच्या सोबत इतकी माणसं जुळलेली आहेत.
लेखन,साहित्य,अभिनय,समाजकार्य किती किती सुरेख रंग, गंध, पैलू आहेत तुमच्या या हरहुन्नरी, प्रतिभावंत,लोभस व्यक्तिम्त्वाला.
तुमची अभिनय क्षेत्रातील दैदिप्यमान कारकीर्द,तुम्ही साकारलेल्या अनेक सुरेख भूमिकांनी आमचं मन मोहून घेतलं आणि कायमस्वरूपी आम्हाला तुमच्या प्रेम बंधनात बांधुन ठेवलं.
निशु ताई तुमचं सौंदर्य जसं मन मोहून घेणारं आहे तसंच तुमचं मन देखील तेवढंच सुंदर आहे.सामाजिक जाणीव जपणाऱ्या तुम्ही समाजातील प्रश्नांचा संवेदनशीलतेने विचार करता.तुमच्या या करूणामयी मनात एक विचार आला आणि झाली सुरुवात डॉ निशिगंधा वाड एज्युकेशन अँड कल्चरल ट्रस्ट या सामाजिक ट्रस्टची.आणि निशुताई तुमच्या कडून हे कार्य होणारच होतं कारण तुमच्या आई सन्माननीय डॉ विजया ताई वाड आणि वडील श्री विजय कुमार यांचे संस्कार आणि आशीर्वाद होते ना तुमच्या सोबत.आपल्या ओंजळीतून ओघळणारं हे इतरांच्या पदरात घालून आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो ही जाणीव तुम्ही जपत आहात.
वाईतील महाराष्ट्र विश्वकोश मंडळाच्या प्रमुख डॉ. विजया वाड या प्रख्यात लेखिका,बाल साहित्यकार तुमच्या आई. निशु ताई तुम्ही वयाच्या अकराव्या वर्षी अभिनयाची राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळवली आणि ती पुढे नऊ वर्षे तुम्हाला मिळत राहिली. ताई सरस्वती तुमच्यावर प्रसन्न आहेच म्हणून तर तुम्ही दहावीच्या परीक्षेत पहिल्या पन्नासात, आणि नंतर बारावीला मेरिटमध्ये तिसऱ्या आल्या होत्या.
भारतीय आणि ब्रिटिश रंगभूमीवरील स्त्रीची बदलती भूमिका या पीएच.डी.च्या प्रबंधासाठी तुम्ही १०० वर्षांचा ऐतिहासिक कालखंड घेऊन तौलनिक अभ्यास केला. २००३मध्ये मुंबई विद्यापीठानं त्यांना पीएच.डी. बहाल केली. त्याची संपूर्ण नाट्य-चित्रसृष्टीत उत्तम दखल घेतली गेली. सन २००४ मध्ये त्यांच्या तीन चित्रपटांच्या महोत्सवासाठी तुम्हाला खास दिल्लीहून बोलावणे आले होते. त्यावेळी अभिनेते सुनील दत्त यांच्या हस्ते ’निशिगंधा गौरव विशेषांका’चे प्रकाशन झाले होते.पिंपरी-चिंचवडच्या कलारंग सांस्कृतिक संस्थेतर्फे कलागौरव पुरस्कार प्राप्त झाला.(२२-१-२०१५)अनेक अनेक पुरस्कार तुम्हाला प्राप्त आहात.पण हा त्या पुरस्कारांचाच सन्मान आहे खरे.
निशु ताई मला तुम्ही पहिल्यांदा भेटल्या तेंव्हा माझ्या कामाचं किती कौतुक केलं.माझ्या पुस्तकांसाठी मला आशीर्वाद दिला.आणि माझा हात धरून मला माझ्या प्रत्येक सामाजिक कार्यात साथ देत आल्या. माझं भाग्य मोठं आहे ताई की तुमची साथ मला मिळाली आहे.तुमच्या ट्रस्ट ने सामाजिक कार्यात अग्रेसर होऊन गरजू बालक ,बालिका ,महिला यांच्यासाठी कायम मदतीचा हात पुढे केला आहे.अनेक स्त्युत्त उपक्रम ट्रस्ट ने हाती घेतले आणि ते यशस्वी रित्या पार पाडले.
डॉ. निशिगंधा वाड एज्युकेशन ऍण्ड कल्चरल ट्रस्ट या कौशल्य विकास केंद्रामार्फत विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
लॉकडाऊन पूर्वी
व्यक्तिमत्त्व विकास शिबिर विद्यार्थ्यांसाठी : मार्गदर्शक – रवींद्र सर
मार्गदर्शक:- रवींद्र सर
विद्यार्थ्यांसाठी नृत्य प्रशिक्षणाचे आयोजन : मार्गदर्शक – संतोष भंगारे
महिलांसाठी ब्युटीपार्लर कोर्सचे आयोजन : मार्गदर्शक – नीता नाहता
किशोरवयीन मुलींसाठी किशोरी आरोग्य कोश : प्रकाशन – आरोग्यमंत्री दीपक सावंत
डॉक्टर्स कॅम्प : डॉ. विलास लढ्ढा
टेकरिंग प्रशिक्षण : डॉ. नीलिमा मिश्रा
संस्कार वर्ग : डॉ. विजया वाड
चला वाचूया उपक्रम: डाॅ. अनिलजी काकोडकर
किशोरी आरोग्यकोशचे मोफत वाटप : विविध शाळेतील १०० विद्यार्थीनी – प्रमुख पाहुणे- डाॅ. स्नेहलता देशमुख
उठावदार कार्य करणार्या महिलांचा नवदुर्गा म्हणून सत्कार :
प्रमुख पाहुण्या डॉ. नीला सत्यनारायण
लॉकडाऊन मध्ये २०२० मधील विविध उपक्रम
ट्रस्टने राबवले आहेत.
विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा
श्रीम.पूनम राणे मनीषा कदम
विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन वेशभूषा स्पर्धा : श्रीम. मनीषा कदम, श्रीम. पूनम राणे
चिपळूण महापुरात आधार गमावलेल्या व्यक्तींना मायेचा हात :
मार्गदर्शक : कलेक्टर प्रवीण यांच्या
करोना काळात आई- वडील गमावलेल्या राज्यस्तरीय विद्यार्थ्यांना मायेचा हात
साहित्य जननी शांताबाई शेळके यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यस्तरीय ५१ साहित्यिकांच्या सहभागातून साहित्यातील गोंदण पुस्तकाचे प्रकाशन.असे कितीतरी उपक्रम तुम्ही राबवत आहात.
अणि निशु ताई आपण कोरोना मध्ये आई वडिलांचा आधार गमावलेल्या बलका विषयी बोललो आणि त्यांची मदत करायला तुम्ही तत्पर झाल्या.माझ्या एका शब्दावर तुम्ही तब्बल पन्नास बालकांना मदतीचा हात दिला.किती प्रेमाने त्या मुलांशी बोलल्या. विजयाताई त्यावेळी हॉस्पिटल मध्ये होत्या तरी तुम्ही ऑनलाईन येऊन सगळ्या मुलांची मायेने विचारपूस केली. तुमचं हे ममता मई रूप माझ्या मनात घर करून गेलं.
निशु ताई तुम्हाला सेंट्रल जूरी कमिटीच्या मेंबर असण्याचा सन्मान मिळाला आहे.याचा आम्हा सगळ्यांना सार्थ अभिमान आहे.
एकत्रित पणे आपण भविष्यात खूप उपयुक्त उपक्रम निश्चितच राबवणार आहोत.अत्यंत संवेदनशीलतेने तुम्ही बालकांच्या आणि महिलांच्या प्रश्नांना समजून घेता आणि तसे उपाय सुचवून आपण त्या कामाला लागतो.आपण मिळून रेड लाईट एरिया तिल बालकांसाठी स्मॉल स्कील वर्कशॉप चा प्रकल्प लवकरच हाती घेणार आहोत.तुमच्या मार्गदर्शनात हा प्रकल्प निश्चितच यशस्वी होणार आहे.
निशु ताई तुमचं सामाजिक कार्य गेली सोळा वर्ष सातत्याने सुरू आहे.त्यामुळे अनेक गरजू बालकांना,महिलांना याचा लाभ घेता आला आहे.तुमच्या कडून हे कार्य अविरत सुरू राहू दे.आम्ही कायम तुमच्या सोबत आहोतच. परमेश्वर कृपेने तुम्हाला उत्तम आरोग्य आणि अरूण ऊर्जा लाभू दे हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
तुझी हसरी गोड छवी
ज्ञानाने तुझी ओंजळ भरली
प्रेम, करुणा तूझ्या ठायी
दीन दुबळ्यावर तू माया केली
हात दिलास मदत दिली
फुलू लागली बाग कशी
या फुलांना लाभली
निशु ताई तुझी साथ सुगंधी
निशु ताई तुझी साथ सुगंधी
लेखन
डॉ राणी दुष्यंत खेडीकर
अध्यक्ष बालकल्याण समिती पुणे