नाशिक: दिनांक २५ फेब्रुवारी २०२३:
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित लोकनेते व्यंकटराव हिरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पंचवटी, नाशिक येथील अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्ष, अर्थशास्त्र विभाग व संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रीय अर्थसंकल्प २०२३-२४ वर एक दिवसीय ऑनलाईन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.
या चर्चासत्रास नाशिक येथील प्रतिष्ठीत चार्टर्ड अकाउंटंट मा. श्री. अनिल खेतमल दहिया प्रमुख वक्ते म्हणून लाभले होते. त्यांनी केंद्रीय अर्थसंकल्प २०२३-२४ वर प्रकाशझोत टाकताना अर्थसंकल्पाची तयारी, अंमलबजावणी, अर्थसंकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये, अर्थसंकल्पातील विविध तरतूदी आणि अर्थसंकल्पाचे सामान्यांवर होणारे परिणाम याविषयी मते व्यक्त केली.
अर्थसंकल्पात शेती, लहान व मध्यम उद्योग, सेवाक्षेत्र, शिक्षण, आरोग्य, बांधकाम इत्यादी वरील भरघोस तरतुदींमुळे रोजगार निर्मितीस चालना मिळेल असे मत मांडले. हा अर्थसंकल्प अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प असून येत्या २५ वर्षांचा तो अर्थव्यवस्थेच्या विकासाचा रोडमॅप आहे. अर्थव्यवस्थेला पाच ट्रिलियन डॉलर पर्यंत नेण्यास अर्थसंकल्पाची मदत होणार असल्याचेही त्यांनी प्रतिपादन केले. अर्थव्यवस्थेचा जलद आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी व परकीय गुंतवणुकीला चालना देण्यासाठी प्रमुख अशा सात क्षेत्रांना प्राथमिकता देण्यात आलेली असल्याचेही त्यांनी सांगितले.
चर्चासत्रात उपस्थित प्राध्यापक व विद्यार्थी यांनी चर्चेत सक्रिय सहभाग नोंदविला.
महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. के. एच. कापडणीस हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. मा. प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे, , उपप्राचार्य डॉ. विनीत रकीबे,, पर्यवेक्षक डॉ. संतोष चोबे, डॉ. सतीष तांबे यांचे मार्गदर्शनाखाली चर्चासत्राचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. ना. ना. गाढे यांनी चर्चासत्राचे प्रास्ताविक केले. डॉ. आशा पाटील यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. डॉ. रुपाली देवरे यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. पूनम ब्राह्मणकर यांनी आभार व्यक्त केले. प्रा. सुजाता आहेर यांनी कार्यक्रम यशस्वितेसाठी सहकार्य केले. चर्चासत्रात विविध महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.